Cashew  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Rate : काजू बीचा दर ११० रुपयांवर स्थिर

Cashew Market : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीची आवक कमी होत असली तरी अजूनही काजू बीचा दर प्रतिकिलो ११० रुपयांवर स्थिरावला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीची आवक कमी होत असली तरी अजूनही काजू बीचा दर प्रतिकिलो ११० रुपयांवर स्थिरावला आहे. दरम्यान, प्रतिकिलो १० रुपये अनुदानाबाबत देखील कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील काजू बीला किमान प्रतिकिलो १०० रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यांतील काजू उत्पादक गेल्या काही महिन्यांपासून आक्रमकपणे आंदोलन करीत आहेत. त्यानंतर काही मंत्र्यांनी प्रतिकिलो १३५ रुपये दर देणार असल्याचे सांगितले तर काही सत्ताधारी प्रतिनिधींनी शासन प्रतिकिलो १० रुपये अनुदान देणार असल्याचे सांगितले.

सध्या काजू बीला जिल्ह्यात प्रतिकिलो ११० रुपये दर मिळत आहे. बांदा बाजारपेठेत प्रतिकिलो १२० रुपये दर दिला जातो. काजूची अपेक्षित आवक अद्याप होत नसली तरीही काजू बीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

त्यातच काजू बी अनुदानाबाबत संदिग्धता असल्यामुळे उत्पादकांमध्ये नाराजी आहे. सध्या मिळत असलेला दर काजू उत्पादनाइतका देखील मिळत नाही. त्यामुळे काजू उत्पादक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यावर्षी काजू बी उत्पादन ३० टक्के इतकेच आहे. मात्र तरीही काजू बीचा दर प्रतिकिलो ११० ते १२० रुपयांवरच स्थिरावला आहे. काजू बीचा उत्पादन खर्च १२९.५० रुपये आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाचे धोरण उदासीन आहे.
विलास सावंत, अध्यक्ष, फळबागातदार संघ, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT