Onion Subsidy Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Subsidy : कांदा अनुदानाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Team Agrowon

Pune News मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कांदा अनुदानासाठी (Onion Subsidy) शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे बाजार समिती कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन प्रशासक पी. एस. रोकडे यांनी केले.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १ फेब्रुवारी ते शुक्रवार (ता. ३१ मार्च) या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे सरकारमार्फत अनुदान देण्यात येणार आहे.

त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे विक्री केलेल्या कांदा विक्रीची मूळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकाची पहिल्या पानाची, आधार कार्डची झेरॉक्स प्रत.

ज्या प्रकरणात सातबारा वडिलांच्या नावे आणि विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे अशा प्रकरणांमध्ये सहमती असणारे शपथ पत्र आदी कागदपत्रांसह आवश्यक त्या नमुन्यात ३ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ पर्यंत बाजार समिती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे तेच शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांनी शेतात कांदा विक्री व्यापाऱ्यांना केली असेल त्यांना अनुदान मिळणार नाही. अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्रीची मुदत वीस एप्रिल अशी आहे.
- पी. एस. रोकडे, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT