Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate: दर पाडून केळी खरेदी 

Banana Market Update: यंदाच्या जून महिन्यात पावसामुळे गिरगाव (ता.वसमत) मंडळातील अनेक गावांतील काढणीस आलेल्या केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात आता व्यापाऱ्यांकडून दर पाडून केळीची खरेदी करण्यात येत आहे.

Team Agrowon

Hingoli News: यंदाच्या जून महिन्यात पावसामुळे गिरगाव (ता.वसमत) मंडळातील अनेक गावांतील काढणीस आलेल्या  केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात आता व्यापाऱ्यांकडून दर पाडून  केळीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अस्मानी-सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. 

वसमत तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यातील गिरगाव, खाजमापूरवाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द आदी गावांतील काढणीस आलेल्या केळी बागांचे ९ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे  प्रचंड नुकसान झाले. सध्या या भागात केळी घडांची काढणी सुरू आहे.

जून महिन्यात सुरुवातीला केळीचे सरासरी दर प्रतिक्विंटल १८०० ते २१०० रुपये  होते. परंतु वादळामुळे झाडे मोडून पडल्यानंतर  व्यापाऱ्यांनी दर  निम्म्याने पाडले असून प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दराने  खरेदी करण्यात येत आहे.

पावसामुळे केळी बागेचे मोठे नुकसान झाले. आता उर्वरित  केळी  काढणी चालू आहे. पूर्वी २१०० रुपये क्विंटल दराने खरेदी सुरू होती. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीनंतर व्यापाऱ्यांकडून निम्म्या दराने म्हणजेच प्रतिक्विंटल १००० ते १२०० खरेदी करण्यात येत आहे. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.     
रमेश दाळपुसे, केळी उत्पादक शेतकरी, गिरगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT