Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा माहोल

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात तेजीचा माहोल असला तरी आता निर्यात फारशी होत नसल्याने याचा फायदा भारतीय साखरेला होत नसल्याचे चित्र आहे.

Raj Chougule

International Sugar Market कोल्हापूर ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात (Sugar Raye) तेजीचा माहोल असला तरी आता निर्यात (Sugar Export) फारशी होत नसल्याने याचा फायदा भारतीय साखरेला (Indian Sugar) होत नसल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी जागतिक बाजारात साखरेचे दर गेल्या सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.

भारतातील अनेक साखर कारखान्यांनी त्यांच्या कोट्याइतके म्हणजे ६० लाख टनांचे साखर निर्यात करार केले आहेत.

केंद्राच्या मर्यादेमुळे या पेक्षा अतिरिक्त साखर निर्यात केली जाऊ शकत नाही. जागतिक बाजारातील साखरेच्या तेजीचा फायदा जोपर्यंत केंद्र आणखी निर्यातीला परवानगी देत नाही, तोपर्यंत भारतीय कारखान्यांना होणार नाही, अशी शक्यता आहे.

जागतिक न्यू यॉर्क वायदे बाजारात शुक्रवारी ३ फेब्रुवारीला रॉ शुगर (कच्ची साखर) २१.२३ पौंड प्रतिसेंट, तर लंडन वायदे बाजारात रिफाइंड साखरेचे ५५१.३० डॉलर प्रतिटन दर होते.

जागतिक स्तरावरील साखर वायदे बाजाराचा विचार करता भारतीय कच्च्या साखरेला, तसेच पांढऱ्या साखरेला ४०००० रुपये प्रतिटन पेक्षा जास्त दरात मागणी आहे. तसेच रिफाइंड साखरेला ४३००० ते ४५००० रुपये प्रति टन एक्स मिल या दरात मागणी आहे.

युरोपमध्ये हंगाम २२-२३ मध्ये मागील वर्षापेक्षा सात टक्के उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. हे घटक जागतिक बाजारात साखरेच्या दरातील तेजीला पोषक आहेत. साखरेमधील ही तेजी ब्राझीलचा हंगाम सुरू होईपर्यंत राहण्याचे संकेत आहेत.

हंगाम २२-२३ मध्ये ब्राझीलमध्ये जादा साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. हंगाम २२-२३ मध्ये थायलंडमध्ये १४ टक्के मागील वर्षापेक्षा जादा साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आतापर्यंतचा भारतीय हंगामाचा विचार करता मागील वर्षीच्या साखरेच्या उत्पादनापेक्षा ३.५ टक्के साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. भारतामध्ये साखर हंगाम २२-२३ मध्ये साखर उत्पादनाचे विविध संस्थांचे वेगवेगळे अंदाज आहेत.

हंगाम २२-२३ चा विचार करता भारतातील नोव्हेंबर २२, डिसेंबर २२, जानेवारी २३, फेब्रुवारी २३ या महिन्यांचा देशांतर्गत साखर विक्रीचा विचार करता, बरेच साखर कारखाने आपल्या कोट्याची संपूर्ण साखर बाजारात विकू शकले नाहीत. हे लक्षात घेता भारतीय देशांतर्गत खप हा वार्षिक २७० लाख टनांपेक्षा कमी होऊ शकतो.

साखर हंगाम २२-२३ सुरू होतानाच सरकारने ६० लाख मेट्रिक टन भारतीय साखरेला निर्यातीची परवानगी दिली.

साखर हंगाम २२-२३ सुरू होताना देशामध्ये अंदाजे ६० लाख टन साखर शिल्लक होती, याचा विचार करता भारतीय देशांतर्गत साखरेचे भाव हे ३३००० रुपये प्रतिटन ते ३५००० रुपये प्रतिटन या दरामध्ये टिकून राहायला हवे होते.

तसेच दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये बरेच साखर कारखान्यांची त्यांच्या देशांतर्गत विक्रीच्या कोट्याची संपूर्ण साखर विक्री होत नाही. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत देशांतर्गत साखरेच्या मागणीमध्ये घट का येते, याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.

देशातील निर्यात घटण्याचा अंदाज

मंगळवारी (ता.१) जागतिक बाजारातील वायदे बाजारात साखरेचे दर सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. साखर हंगाम २२-२३ मध्ये भारतामध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.

तसेच मागील हंगाम २१-२२ मधील साखर निर्यातीपेक्षा भारतातून हंगाम २२-२३ मध्ये साखर निर्यातीत घट होण्याचा अंदाज आहे. युरोपमध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.

सरकारने हंगाम २२-२३ करिता ६० लाख टन साखर निर्यातीची एकत्रितरीत्या परवानगी दिली, या ऐवजी २० लाख टनाचे तीन टप्पे किंवा ३० लाख टनाचे दोन टप्पे अशी योजना आणली असती तर कारखानदारांना जागतिक बाजारातील तेजीचा फायदा झाला असता.

अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT