Sugar Rate : देशाअंतर्गत बाजारात साखरदरात वाढ नाहीच

साखर निर्यातीचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात साखरेचे दर क्विंटल ला ३२७० ते ३३५० पर्यंतच आहेत.
Sugar Export
Sugar Export Agrowon

कोल्हापूर : साखर निर्यातीचा (Sugar Export) निर्णय झाल्यानंतर स्थानिक बाजारात साखरेचे दर (Sugar Rate Domestic Market) वाढतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात साखरेचे दर (Sugar Rate) क्विंटल ला ३२७० ते ३३५० पर्यंतच आहेत. दिवाळीनंतर मंदावलेली मागणी (Sugar Demand) अजूनही कमीच आहे. जादा साखर उत्पादनाच्या (Sugar Production) अंदाजामुळे स्थानिक बाजारात दर वाढत नसल्याची स्थिती आहे. देशात सध्या नवीन साखर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. दर मात्र फारसे समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.

Sugar Export
Sugar Export : साखर दरातील तेजीचा निर्यातीवर काय परिणाम होणार?

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबरमध्ये साखरेला चांगली मागणी होती दरही ३५०० पर्यंत गेले होते. या दरम्यान जर निर्यात धोरणाचा निर्णय झाला असता तर साखरेचे दर तेजीत राहिले असते. साधारणपणे देशातील हंगाम सुरू झाल्यानंतर एका महिन्याभरात नवी साखर बाजारात येण्याचे प्रमाण सुरू होते.

Sugar Export
Sugar Export : नव्या निर्यात करारावर नकारात्मक परिणाम शक्य

जर निर्यात धोरण ऑक्टोबरला जाहीर झाली असते तर नवी साखर बाजारात नसल्याने साखरेचे दर चांगले वाढले असते. मात्र दिवाळीचा हंगाम संपायला आणि नवीन साखर बाजारात यायच्या वेळेसच निर्यात धोरण जाहीर झाले. याचा फारसा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरावर झाला नाही. आगामी काळात ही मोठे सण नसल्याने साखरेला एकदम मागणी येईल, अशी शक्यता नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

सध्या देशांतर्गत बाजारात व्यापारी जेवढी लागेल तेवढीच साखर खरेदी करत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पुरेशी साखर उपलब्ध होणे शक्य असल्याने व्यापाऱ्यांनीही जादा साठा करून ठेवला नाही यामुळे खरेदीदरामध्ये स्पर्धा नसल्याचे व्यापारी सूत्रानी सांगितले.

निर्यात करार झालेली साखर देशाबाहेर गेल्याने दर सुधारतील, अशी अपेक्षा कारखानदारांना होती. मात्र निर्यातही हवी तेवढी गतीने झाली नाही. गेल्या हंगामाच्या तुलनेत या कालावधीत फक्त ५० टक्केच साखर निर्यात झाली. स्थानिक मागणी ही रोडावली यामुळे स्थानिक दरात वाढ झाली नाही.

स्थानिक मागणी नसल्याने अनेक साखर कारखानदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात चाचपणी करून साखर निर्यात करार करण्यास प्राधान्य दिले आहे. स्थानिक बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर अजून तरी चांगले असल्याने कारखानदारांना शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी निर्यात साखरेची मोठी मदत होणार आहे.

सध्या बहुतांशी कारखानदारांमध्ये निर्यात करार करण्यासाठी गडबड सुरू झाली आहे. यामुळेच देशात ३५ लाख टनांहून अधिक करार झाले आहेत. केंद्राने मे अखेरपर्यंत दिलेला ६० लाख टनांचा कोटा डिसेंबर जानेवारीमध्येच संपून जाईल, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. अनेक कारखानदार निर्यातीला चांगला दर मिळत असल्याने स्थानिक बाजारापेक्षा केंद्राने दिलेल्या कोट्या इतकी साखर निर्यात करण्यासाठी धडपडत आहेत.

साखर उद्योगातील संस्थांनी देशात जादा साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवल्याने स्थानिक बाजारात साखरेला मागणी फारशी नाही. यामुळेच दरही तेजीत नाहीत. आणखी दोन महिन्यांमध्ये दर किमान विक्री मूल्याच्या (एमएसपी) आसपास म्हणजे ३१०० रुपयांपर्यंत येतील अशी शक्यता आहे. स्थानिक विक्रीच्या तुलनेत निर्यात करार मात्र वेगात आहेत.
अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com