MSP Price Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Procurement : आधारभूत किमतीने धान खरेदीला लागला ब्रेक

शासकीय धान खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यास हा धान खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे.

Team Agrowon

MSP Procurement Scheme ः आधारभूत किमतीने धान खरेदीची (Paddy Procurement) मुदत संपल्याने ३१ जानेवारीपासून खरेदी ठप्प झाली आहे. मात्र त्यानंतरही तब्बल १५ लाख क्‍विंटल धान शेतकऱ्यांकडे पडून असल्याने या धानाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

आधारभूत केंद्रावर २०६० तसेच २०४० रुपये या हमीदराने धानाची खरेदी (Paddy MSP) केली जात आहे. धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२२ पासून धान खरेदीला सुरुवात झाली.

जिल्ह्याला सुरुवातीला ४१ लाख ८८ हजार क्‍विंटल आणि त्यानंतर वाढीव २ लाख ७० हजार क्‍विंटल असे एकूण ४४ लाख ५८ हजार क्‍विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्यातील २८० केंद्रावर धान खरेदी सुरू झाली.

आतापर्यंत ३९ लाख १२ हजार ७०१ क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. धान खरेदीची अंतिम मुदत ३१ जानेवारी असल्याने मंगळवार (ता. ३१) पासून धान खरेदी पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे त्यांच्यासमोर विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे सुमारे १५ लाख क्‍विंटल धान शिल्लक असल्याची शक्‍यता प्रशासकीय पातळीवर वर्तविली जात आहे. शासकीय धान खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यास हा धान खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे.

व्यापाऱ्यांकडून या संधीचा फायदा घेत हमीदरापेक्षा कमी दरात धानाची खरेदी होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील शिल्लक धानाचा विचार करता शासनाने तत्काळ धान खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे.

११ हजार शेतकरी वंचित

भंडारा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ७१६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने धान विक्रीसाठी नोंदणी केली. ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ९७१ शेतकऱ्यांनी धान विक्री केली. मात्र अद्यापही १ हजार ७४५ शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. त्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी आहे.

दहा लाख क्‍विंटलचा प्रस्ताव

जिल्ह्याला ४४ लाख क्‍विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु शिल्लक धानाचा विचार करता पणन महासंघाने १० लाख ५५ हजार क्‍विंटल धान खरेदीची उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT