Cashew Processing  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बीच्या दरात मोठी घट

Cashew Rate Update : काजू बीच्या दरात मोठी घट झाल्यामुळे बी साठवणूक करून ठेवलेल्या काजू उत्पादकांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Sindhudurg Cashew Market News : काजू बीच्या दरात (Cashewnut Rate) मोठी घट झाल्यामुळे बी साठवणूक करून ठेवलेल्या काजू उत्पादकांची चिंता वाढली आहे. हजारो टन माल अजूनही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे. परंतु अजूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने बागायतदारांमधील अस्वस्थता वाढली आहे.

जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर काजू लागवड असून ५९ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यावर्षी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू हंगामाला प्रारंभ झाला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काजू बी ची आवक वाढली.

काजू बी ला प्रतिकिलो सुरुवातीला ११५ रुपये दर होता. त्यामध्ये वाढ होऊन तो प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत पोहोचला. परंतु जिल्ह्यात काजू विक्री वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कमी झाडे असलेले शेतकरी काजू बी काढल्यानंतर त्याच आठवड्यात त्याची विक्री करतात.

आठवडा बाजारात काजू बी ची खरेदी होते. त्या त्या आठवड्याचा दर काजू बी ला दिला जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे ते शेतकरी मात्र काजू बी काढल्यानंतर ती स्वच्छ धुवून वाळवून त्याचा साठा करून ठेवतात. काजू हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर काजू बी चे दर वाढतील असा बागायतदारांचा अंदाज होता.

परंतु एप्रिल अखेरीसदेखील काजू बी दर प्रतिकिलो १०० ते १०५ वरच अडखळले आहेत. त्यामुळे मे महिन्यात दर वाढतील की नाही, असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे.

प्रत्येक तालुक्यात शेकडो काजू बी अजूनही बागायतदारांच्या घरात पडून आहे. त्यामुळे या बी ची वेळेत विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सध्याचा दर १०० रुपये असून त्या दराने काजू बी विक्री करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माझ्याकडे चार टन काजू बी आहे. ती धुवून, वाळवून ठेवली आहे. मात्र अपेक्षित दर नसल्याने त्याची विक्री केलेली नाही. काजू बी चा दर वाढेल की नाही असा संभ्रम आमच्या मनात आहे.
छोटू राणे, काजू उत्पादक, कुणकवण, ता. देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coriander Intercropping: उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती

Smart Farming: ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्रिसूत्रीचा आदर्श : विक्रम गायकवाड

Women Farmers Empowerment Bill: कागदी ओळख की हक्कांची लढाई?

Onion Procurement Irregularities: सडके कांदे दूर करा

Onion Procurement Irregularities: केंद्राच्या कांदा खरेदीत अधिकारी-दलालांच्या संगनमताचा आरोप

SCROLL FOR NEXT