Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी आवकेत मोठी घट

Banana Rate : खानदेशात केळीची आवक घटली आहे. दरही कमाल १८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक घटली आहे. दरही कमाल १८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. दर्जेदार केळीला मागणी असून, केळीची पाठवणूक उत्तरेकडे अधिकची केली जात आहे.

दिवाळी सणामुळे अनेकांनी केळीची काढणी केली नाही. यातच केळीच्या आवकेत मागील सहा ते सात दिवसांत सतत घट झाली आहे. केळीला खानदेशात उठाव कायम आहे. सध्या प्रति क्विंटल १५०० ते १८०० व सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर केळीस खानदेशात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी दर कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

केळीची आवक खानदेशात सध्या प्रतिदिन ५० ते ५५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. या आवकेत मागील सात ते आठ दिवसांत सुमारे आठ ते १० ट्रकने घट झाली आहे. बऱ्हाणपुरातही केळी आवक ९१ ते ९२ ट्रकवरून ७० ते ७५ ट्रक एवढी झाली आहे.

तेथे दोन ते १० टन क्षमतेच्या ट्रक, मालवाहू वाहनांतून केळीची आवक होते. तेथे एकूण आवक ५० ते ६० टन एवढीच राहिली आहे. दरात मात्र मोठी वाढ झालेली नाही. केळीदर वाढ करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण दर्जेदार केळी खानदेशात काढणीवर आहे. या केळीस उठावही आहे.

केळीची आवक मागील महिन्याच्या मध्यात प्रतिदिन सरासरी ७० ते ८० ट्रक एवढी होती. त्यात हळूहळू घट झाली आहे. केळी आवकेत आणखी २० ते २५ दिवस कोणतीही वाढ होणार नाही.

जळगाव जिल्ह्यात सध्या चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, यावल या भागांत केळीची आवक अधिक आहे. तर रावेर, मुक्ताईनगर भागांत आवक कमी आहे. धुळे व नंदुरबारातही आवक अल्प आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार, जाणून घ्या कधी मिळेल 'पीएम किसान'चा २१ हप्ता?

Water Conservation : जलयुक्त शिवार आराखड्यात २६८८ कामे प्रस्तावित

local Body Elections: नगर परिषद निवडणुकीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र

MSP Procurement: नांदेड जिल्ह्यात ३३ शासकीय खरेदी केंद्रांना मान्यता

SCROLL FOR NEXT