Turmeric Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Futures Rate : हळदीच्या वायद्यांमध्ये १५ दिवसांत मोठी तेजी

Turmeric Market : गेली दोन वर्षे मंदीत असलेल्या हळदीच्या दरात मागील १५ दिवसांमध्ये चांगली वाढ झाली आहे. वायदे बाजारात हळदीने दीड वर्षानंतर ९ हजारांचा टप्पा पार केला.

अनिल जाधव

Pune News : गेली दोन वर्षे मंदीत असलेल्या हळदीच्या दरात मागील १५ दिवसांमध्ये चांगली वाढ झाली आहे. वायदे बाजारात हळदीने दीड वर्षानंतर ९ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्येही ७ हजारांच्या पुढे भाव गेले आहेत. तसेच हळदीच्या दरातील ही तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील बाजारात मागील १५ दिवसांमध्ये हळदीच्या भावात चांगली सुधारणा झाली. वायद्यांमध्ये झालेली सुधारणा जास्त होती. वायद्यांमध्ये मागील १० दिवसांमध्ये तब्बल २० ते २२ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती.

१३ जून रोजी हळदीचे वायदे ७ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटलवर होते. शुक्रवारी (ता.२३) वायदे ९ हजार ३०० रुपयांवर बंद झाले. गुरुवारी (ता.२२) वायद्यांनी एकदा ९ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मागील दीड वर्षांत पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी ९ हजारांचा टप्पा गाठला.

वायद्यांमध्ये मोठी तेजी आली तरी प्रत्यक्ष बाजारांमध्ये मात्र हळदीला मिळणारा भाव यापेक्षा कमी आहे. हळदीचे व्यवहार सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांनी होत आहेत. बाजार समित्यांमध्येही मागील पंधरवड्यात हळदीच्या भावात एक हजार रुपयांची सुधारणा झाली. तर बाजारातील हळद आवकही कमी झाली आहे. यामुळे दराला आधार मिळाला.

आवकेत ५० टक्के घट

देशात चालू हंगामात १३ लाख टन हळद उत्पादन झाल्याचे भारतीय मसाला बोर्डाने म्हटले आहे. पण देशातून हळद निर्यातही चांगली सुरु झाली. त्यातच सध्या मालाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारातील आवक जवळपास ५० टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल महिन्यात देशातून जवळपास २० हजार टनांची निर्यात झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत ही निर्यात ४ टक्क्यांनी अधिक होती. तर एप्रिल २०२२ च्या तुलनेत ४२ टक्क्यांनी जास्त होती.

दरवाढीची कारणे अशी...

- चालू हंगामातील देशातील महत्त्वाच्या हळद उत्पादक भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस नाही.

- लागवड १५ दिवस उशिरा होण्याचा अंदाज

- मागील दोन वर्षे उत्पादकांना कमी भाव मिळाला, त्यात यंदा पावसास उशीर

- परिणामी हळद लागवड कमी होण्याची शक्यता

- यंदा महाराष्ट्रातील लागवड १० ते २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज.

- तमिळनाडूत १० ते १५ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणात लागवड क्षेत्र १८ ते २२ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

- परिणामी हळदीच्या भावात सुधारणा

जागतिक पातळीवर हळदीला मागणी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तुटवडा दिसतो. त्यातच देशातील हळद लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली. बाजारातील घटक पाहता हळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते.
- अजय केडिया, संचालक, केडिया कॅपिटल्स.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT