Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याचे दर टिकून, आवक कमी

Bedana Rate : बेदाण्याच्या वर्षभर विक्रीचे नियोजन शेतकरी करतो. मात्र सध्या सण आणि तितकेसे लग्न समारंभ नसल्याने बाजारपेठेत बेदाण्याची आवक कमी झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बेदाण्याच्या वर्षभर विक्रीचे नियोजन शेतकरी करतो. मात्र सध्या सण आणि तितकेसे लग्न समारंभ नसल्याने बाजारपेठेत बेदाण्याची आवक कमी झाली आहे. बेदाण्याचा पुरेसा उठाव होत नाही.

तासगाव, सांगली आणि पंढरपूर या बाजार समितीत बेदाण्याची ३१०० टन आवक होत आहे. आवकेच्या ७० टक्के विक्री होत आहे. सध्या बेदाण्याला ११० ते २३० रुपये असा दर मिळत असून गेल्या महिन्याभरापासून दर टिकून आहेत, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.

बेदाण्याला वर्षभर मागणी असते. सण आणि लग्न-समारंभाच्या काळात मागणी आणि दरही चांगले असतात. निर्मितीचा हंगाम आणि बाजारातील आवक यावर दर ठरत असले, तरी साठवण शक्य असल्याने दरात जास्त चढ-उतार पाहायला मिळाले नाहीत.

यंदाचे उत्पादन घटले आहे. नवीन बेदाणा विक्रीचा हंगाम सुरू झाल्यापासून बेदाण्याच्या दरात फारशी तेजी-मंदी आली नाही. फेब्रुवारी महिन्यापासून मार्च अखेरपर्यंत सुमारे ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

वास्तविक पाहता, एप्रिल ते जून या काळात लग्न समारंभ, रमजान आणि बेकरी उत्पादनासाठी बेदाण्याची मागणी असते. परंतु रमजान महिना सोडला तर या महिन्यात फारशा लग्नाच्या तिथी नव्हत्या. त्यामुळे बाजारात बेदाण्याची मागणी कमी झाली असल्याने सौद्यासाठी बेदाण्याची आवक कमी झाली आहे.

परिणामी, बेदाण्याचा अपेक्षित उठाव झाला नाही. तासगाव बाजार समितीत आठवड्यातून तीन दिवसांत १०० गाड्या, पंढरपूरमध्ये एका आठवड्यातून एका दिवशी १५० गाड्या सांगली बाजार समितीत एका दिवसांत ६० गाड्या अशा एकूण म्हणजे एक ३१० गाड्या म्हणजे ३१०० टन बेदाणा विक्रीला येत आहे. त्यापैकी ७० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे.

यंदाचा नवीन बेदाण्याचा विक्रीचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू झाला. या दरम्यान, बेदाण्याचे दर प्रतवारीनुसार प्रतिकिलोस ११० ते २१० रुपये असा दर होता. मार्च महिन्यात होळी सणानिमित्त बेदाण्याची आवक वाढली असून उठावही झाला. एप्रिलमध्ये बेदाण्याला चांगली मागणी होती. या तीन महिन्यांत बेदाण्याचे दर टिकून राहिले.

सध्या बेदाण्याची आवक कमी असली तरी बेदाण्याचे दर स्थिर आहेत. पुढच्या महिन्यापासून बाजारापेठेत बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. उठावही चांगला होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. प्रतवारीनुसार बेदाण्याला चांगले दर मिळत आहेत.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT