Raisin Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Rate : तासगाव बाजार समतीत बेदाण्याचे दर टिकून

बेदाण्याचे येणे-देणे पूर्ण करण्यासाठी महिनाभर सौदे व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनाने बंद ठेवले होते. बेदाणा व्यापाऱ्यांनी सर्व येणी-देणी पूर्ण केली आहेत.

अभिजीत डाके

सांगली ः बेदाण्याचे येणे-देणे (Raisin Payment) पूर्ण करण्यासाठी महिनाभर सौदे व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनाने बंद ठेवले होते. बेदाणा व्यापाऱ्यांनी सर्व येणी-देणी पूर्ण केली आहेत. शून्य पेमेंटसाठी सुमारे महिनाभर बंद ठेवण्यात आलेले बेदाण्याचे सौदे (Raisin Trade) सोमवारपासून (ता. १४) सुरू झाले आहेत.

दिवाळीपूर्वी बेदाण्याचा दर प्रति किलोस १२५ ते २२५ रुपये होता. दिवाळीच्या सुट्टीनंतर तासगाव बाजार समितीत दीड ते २ हजार टन बेदाण्याची आवक झाली. बेदाण्याला प्रति किलोस १२५ ते २२५ रुपये दर मिळाला असून बेदाण्याचे दर टिकून आहेत. येत्या काही काळात बेदाण्याच्या दरात सुधारणा होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकरांनी व्यक्त केला.

शून्य पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे गत महिन्यात बंद करण्याचा निर्यण सांगली-तासगाव बेदाणा संघटनेने घेतला होता. तसेच शीतगृहही बंद ठेवले होते. बाजार समितीने शून्य पेमेंटसाठी पाठपुरावादेखील केला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी व्यापारी, अडते आणि बाजार समिती प्रशासन अशी एकत्रित बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व बेदाणा व्यापारी आणि अडते उपस्थित होते.

या बैठकीत व्यापाऱ्यांकडील सर्व येणी-देणी झाली आहेत का याची पडताळणी करण्यात आली. वास्तविक, दरवर्षी बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना येणी-देणी पूर्ण करा, असे परिपत्रक काढण्यात येते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे संघटनेकडून दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी लागते. परंतु यंदा व्यापारी, अडते यांनी येणी-देणी वेळेत पूर्ण केल्याने मुदतवाढ देण्याची वेळ आली नाही. त्यानंतरच बेदाणा सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शून्य पेमेंट पूर्ण झाल्याने सोमवारपासूनच बेदाण्याच्या सौद्यास प्रारंभ करण्यात आला. तासगाव बाजार समितीत दिवाळी सुट्टीनंतरच पहिला सौदा सुरू झाला. या सौद्याला सुमारे दीड ते २ हजार टन बेदाण्याची आवक झाली. बेदाण्याला १२५ ते २२५ रुपये दर मिळाला. दरम्यान, दिवाळीपूर्वी बेदाण्याची मोठी विक्री झाली होती. या वेळी बेदाण्याला १२५ ते २२५ रुपये दर होता. अर्थात दिवाळी सुट्टीनंतर बेदाण्याचे दर सुधारणार की घसरण होणार अशी चर्चा होती. सध्यातरी बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शून्य पेमेंटची पूर्तता पूर्ण झाल्याने बेदाण्याचे सौदे सुरू झाले आहेत. सध्या बेदाण्याचे दर दिवाळीपूर्वीप्रमाणेच टिकून आहेत. बेदाणा सौद्याला येत्या काही दिवसांत गती येईल.
राजेंद्र कुंभार, अध्यक्ष सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT