Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import Duty : बांगलादेशने हटविले खाद्यतेलावरील आयात शुल्क

Inflation Control: राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासोबतच सामान्यांना ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे याकरिता बांगलादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासोबतच सामान्यांना ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे याकरिता बांगलादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबचत आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर देखील १५ वरून पाच टक्‍के करण्यात आला आहे.

बांगलादेशला कापड उद्योग मोठा असला तरी कापूस लागवड क्षेत्र अत्यल्प आहे. परिणामी देशांतर्गत कापड उद्योगाची गरज भागविण्यासाठी बांगलादेशकडून कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. नजीकच्या काळात भारताऐवजी पाकिस्तानशी संबंध वाढविण्यासाठी बांगलादेशकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे कापूस आयातीसाठी देखील आता भारताऐवजी पाकिस्तानला बांगलादेशकडून पसंती मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कापसासोबतच देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता बांगलादेशकडून खाद्यतेलाची देखील आयात केली जाते. बांगलादेशची खाद्यतेलाची वार्षिक मागणी २३ लाख टन इतकी आहे. बांगलादेशमध्ये २०२३-२४ या वर्षात १३.५५ लाख हेक्‍टर क्षेत्रावर तेलबियावर्गीय पिकांची लागवड होती. त्यामध्ये सर्वाधिक ६६ टक्‍के क्षेत्रावर मोहरीची लागवड आहे. परंतु यातून देशांतर्गत खाद्यतेलाच्या गरजेची पूर्तता करणे शक्‍य होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात बांगलादेशला करावी लागते.

बांगलादेशकडून आयात शुल्क तसेच १५ टक्‍के वॅटची आकारणी होत होती. परिणामी, खाद्यतेलाचे दर चांगलेच वधारले होते. सामान्य जनतेच्या मनात सरकारविरोधात आक्रोश वाढीस लागला होता. याची दखल घेत बांगलादेश सरकारकडून आयातील खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच वॅट करदेखील १५ टक्‍क्यांवरून कमी करून पाच टक्‍के आकारला जाणार आहे. बांगलादेश सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्‍यात राहतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

सूर्यफूल, पाम, करडई तसेच सोयाबीन या तेलांवरील आयात शुल्क १५ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. बांगलादेशमध्ये बाटलीबंद सोयाबीन तेलाची किंमत १७५ रुपये टका बांगलादेशी चलन (१२२.८१ रुपये भारतीय चलन) प्रति लिटर होती. खुले तेल १५७ टका बांगलादेशी चलन प्रति लिटर (११०.१८ रुपये भारतीय चलन) होती. विशेष म्हणजे डिसेंबर २०२४ या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरात २० टक्‍के वाढीनंतर बांगलादेशमध्ये खाद्यतेलाचे दर सरासरी आठ टका प्रति लिटर याप्रमाणे वाढविण्यात आले होते. आता या दरात घट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

भारतात आयात वाढण्याची शक्यता

बांगलादेशकडून खाद्यतेल आयात शुल्क शून्य करण्यात आले आहे. याचा परिणाम भारतीय खाद्यतेलाच्या आयातीवर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलावर सध्या शुल्क आहे. त्यामुळे भारतात बांगलादेशमार्गे रिफाइंड तेलाची आयात वाढेल, अशी शक्‍यता देखील वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला नुकसानीचा आढावा; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Scientific Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक

Summer Crop Sowing: तीन जिल्ह्यांत २४ हजार८६२ हेक्टरवर पेरणी

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT