Banana Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market Rate : खानदेशात केळी दर २६०० रुपयांवर स्थिर

खानदेशात मागील आठवड्यात केळीची आवक काहीशी वाढली. कमाल दर २६११ रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

Team Agrowon

Banana Market Update जळगाव ः खानदेशात मागील आठवड्यात केळीची आवक (Banana Arrival) काहीशी वाढली. कमाल दर (Banana Rate) २६११ रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. तर किमान दर १९००, २१०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

या महिन्यातील मागील पंधरवड्यात केळीची प्रतिदिन सरासरी आवक ६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) अशी होती.

या पंधरवड्यात सुरवातीलादेखील प्रतिदिन ६५ ट्रक केळीची आवक होती. पण या पंधरवड्याच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच मागील चार ते पाच दिवसांत केळीची आवक प्रतिदिन ७२ ट्रक अशी राहिली. पण केळीला सर्वत्र उठाव आहे.

यामुळे दर टिकून आहेत. केळीची परदेशातील निर्यातही या महिन्यात प्रतिदिन सात कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) अशी राहिली.

परदेशात निर्यातीच्या केळीला प्रतिक्विंटल २९०० रुपये दर आहे. निर्यात सुरू असल्याने स्थानिक बाजारात केळीचा तुटवडा कायम आहे. उत्तर भारतात केळीची मागणी सुरू झाली आहे. परंतु ही मागणी सध्या हवी तशी नाही. परंतु परदेशात केळीला चांगला उठाव आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत.

राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर तसेच छत्तीसगड येथेही केळीची पाठणूक खानदेशातून सुरू आहे. दिल्ली, पंजाब येथेही केळीची पाठवणूक सुरू आहे. काश्मीरमधून मागणी आहे. तेथेही काही एजंट केळीची पाठवणूक करीत आहेत. केळीची आवक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही कमीच आहे. तेथेही सध्या प्रतिदिन ७२ ते ७३ ट्रक केळीची आवक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेरातूनही तेथे केळी पाठविली जात आहेत. खानदेशात सध्या धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व अक्कलकुवा भागातही केळीची काढणी सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा या भागातही काढणी सुरू आहे. दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. पिलबाग किंवा खोडवा केळीमध्येही जोमदार किंवा दर्जेदार केळी उपलब्ध आहे.

जशी उष्णता वाढेल, तशी केळीची आवकही वाढू शकते. ही आवक पुढे वाढू शकते, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : हमीभाव, कर्जमुक्ती, बियाणे विधेयकाविरोधात फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा; शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा

Mango Season: आंबा हंगाम लांबण्याची शक्यता

Climate Change Impact: थंडीत अवकाळीचा तडाखा

liquor Free Villages: दारूबंदी करणाऱ्या गावांना विशेष विकासनिधी

Livestock Development Schemes: ‘पशुसंवर्धन’च्‍या योजना काही महिन्यांपासून ठप्‍प

SCROLL FOR NEXT