Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : खानदेशात केळी दर तीन हजारांवर स्थिर

खानदेशात निर्यातीच्या किंवा उच्च दर्जाच्या केळीचे दर तीन हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. आवकही सध्या कमी आहे.

Team Agrowon

Banana market Update जळगाव ः खानदेशात निर्यातीच्या (Banana Export) किंवा उच्च दर्जाच्या केळीचे दर (Banana Rate) तीन हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. आवकही सध्या कमी आहे.

कमी दर्जाच्या केळीलाही एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील पंधरवड्यात केळीची प्रतिदिन सरासरी ६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक (Banana Arrival) झाली आहे.

आवक नीचांकी पातळीवर आहे. मागील हंगामात फेब्रुवारीच्या अखेरीस प्रतिदिन सरासरी ११० ट्रकवर केळीची आवक झाली होती. धुळे व नंदुरबारात केळीची आवक अल्पच आहे. धुळ्यात फक्त शिरपूर तालुक्यात काहीशी आवक होत आहे.

नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनर, चोपडा, जामनेर आदी भागांत पुढील महिन्यात केळीची आवक सुरू होईल. दर्जेदार केळी या भागात आहे. थंडीमुळे काढणी रखडली आहे.

मागील पंधरवड्यात केळीची आवक आणखी १३ ते १५ ट्रकने कमी झाली आहे. उष्णता वाढत आहे. परंतु उत्तर भारतात केळीची मागणी हवी तेवढी नाही. सध्या परदेशात निर्यातीसाठी केळीला उठाव आहे.

दर्जेदार केळीचीी निवड निर्यातीसाठी करीत आहेत. चोपडा, शिरपूर, यावल भागात निर्यातीसंबंधी काम सुरू आहे. खानदेशातून रोज दोन कंटेनर केळीची निर्यात होत आहे. स्थानिक भागातही मागणी आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, छत्तीसगड येथे कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक सुरू आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक सध्या प्रतिदिन ४० ट्रक असल्याची माहिती मिळाली. तेथेही कमी दर्जाच्या केळीचे दर १००० ते १२००, १३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. आवक मार्चच्या मध्यापर्यंत वाढेल किंवा बऱ्यापैकी होईल, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT