Banana Rate : केळीच्या दरात तेजी

नवीन वर्षाची सुरुवात केळी उत्पादकांसाठी चांगली ठरली आहे. कधी नव्हे ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केळीचा दर दीड हजार रुपयांवर पोहोचला आहे.
Banana Rate
Banana RateAgrowon

अकोला : नवीन वर्षाची सुरुवात केळी उत्पादकांसाठी (Banana Farmer) चांगली ठरली आहे. कधी नव्हे ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केळीचा दर (Banana Rate) दीड हजार रुपयांवर पोहोचला आहे. सध्या मालाची उपलब्धता कमी असल्याने खरेदीदार ऑनवर सुद्धा खरेदी करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

Banana Rate
Banana Processing : केळीपासून चिप्स, पावडर कशी बनवाल?

फळ पिकांमध्ये केळी या भागात एक प्रमुख पीक बनलेले आहे. प्रामुख्याने अकोट, तेल्हारा तालुक्यांत केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सध्या या भागातील केळी (खुटी) साडेसोळाशे रुपयांपर्यंत विकत आहे. त्यातही चांगला दर्जाचा माल असेल, तर ऑनवर १०० ते १५० रुपये देत १८०० रुपयांपर्यंत खरेदी केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Banana Rate
Banana Rate : मेहनत फळाला आली

दरवर्षी साधारणपणे या काळात ८०० ते ११०० रुपयांपर्यंत दर राहतात. गेल्या आठवड्यापर्यंत केळी ८५० ते ९०० रुपयांपर्यंत विकत होती. आता मात्र केळीचा दर १६५० रुपयांवर येऊन पोहोचला आहे.

जळगाव जिल्हयात नवतीचा माल कमी असल्याने मागणी पूर्ण करण्यासाठी केळीचा दर वाढल्याचे कारण दिले जात आहे.

स्थानिक भागात खुटीचा माल राहतो. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री असल्याने त्यादरम्यान हा दर आणखी वाढण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. किमान दोन हजार रुपयांपर्यंत केळीचा दर पोहोचू शकतो, असे केळी उत्पादकांकडून सांगितले जात आहे.

या वर्षी सार्वत्रिक उत्पादन कमी असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी केळीच्या दरांमध्ये वाढ झाली.

साधारणतः आठवडाभरात दुपटीहून अधिक दर झाल्‍याचे शेतकरी सांगत आहेत. चांगल्‍या दर्जाचा माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. शेतकऱ्यांना आॅनवर पैसे देऊन व्यापारी केळी खरेदीला पसंती देत आहेत.

माझ्याकडे केळीचा माल सध्या उपलब्ध आहे. हा माल मी महाशिवरात्रीसाठी ठेवलेला आहे. त्या काळात केळीचा दर सध्यापेक्षा अधिक राहील अशी शक्यता वाटते आहे. स्थानिक बोर्डसुद्धा दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत.

- विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com