Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : खानदेशात केळीदर टिकून, आवकही स्थिर

Khandesh Banana Market : खानदेशात केळीदर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीची आवक स्थिर असून, मागणी कायम आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीदर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीची आवक स्थिर असून, मागणी कायम आहे.

सध्या खानदेशात रोज १२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत मागील आठ ते १० दिवसांत सुमारे १० ट्रकने वाढ झाली आहे. परंतु सणासुदीमुळे केळीस उठाव आहे. यामुळे दर टिकून आहेत.

निर्यातक्षम केळीही जळगावातील चोपडा, यावल, पाचोरा, जामनेर भागात उपलब्ध आहेत. दर्जेदार केळीस प्रतिक्विंटल ३१०० रुपये दर आहे. तर कमी दर्जाच्या केळीचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तसेच २०००, २६०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही केळीस दर्जानुसार मिळत आहे.

केळीची आवक स्थिर आहेत. त्यात मोठी वाढ खानदेशात अपेक्षित नाही. कारण रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत आवक अल्प आहे. या भागात पिलबाग व उशिराच्या मृग बहर केळी बागांतून केळीची आवक होत आहे. कांदेबाग केळीची आवक चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, जळगाव, यावल या भागांतून सुरू आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक कमी आहे. तेथे सध्या रोज १०० ते ११० ट्रक आवक लिलावासाठी होत आहे. तेथेही केळीचे कमाल दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दर्जेदार केळीची आवक तेथे होत आहे.

जळगावसह बऱ्हाणपुरातील केळीची पाठवणूक उत्तर भारतात अधिकची केली जात आहे. तसेच जळगावच्या केळीला नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, राजस्थान, छत्तीसगड येथेही मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT