Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळी आवकेत वाढ सुरू

Banana Rate : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही कमाल दर मध्यंतरी २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. पण तेथील कमाल दरही दोन दिवसांपासून वधारलेले नाहीत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील १५ ते १८ दिवसांत सतत सुधारणा झाली आहे. पण आता आवकेत वाढ सुरू झाल्याने कमाल दरातील वाढ थांबली असून, सध्या किमान १५०० व कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही कमाल दर मध्यंतरी २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. पण तेथील कमाल दरही दोन दिवसांपासून वधारलेले नाहीत. तेथे सध्या किमान १६०० व कमाल २३०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस लिलावात बाजार समितीत मिळत आहे.

सध्या केळीची आवक कमी आहे. कमी दर्जाची केळी मिळणेही खानदेशात दुरापास्त झाले आहे. मागील वर्षी जानेवारी व फेब्रुवारीत केळी दरात मोठी घट झाली होती. दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु यंदा मात्र दर जानेवारीच्या मध्यानंतर वधारले. आता दर टिकून आहेत. कमाल दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकच मागील दोन आठवड्यांत राहिले आहेत.

डिसेंबरध्ये कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात हळूहळू घसरण झाली. परंतु केळीची आवकही कमी आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन ४० ते ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

दुसरीकडे दाक्षिणात्य भागातून उत्तरेकडील केळीची आवक कमी झाल्याने दर टिकून आहेत. काश्मीर येथे पाठवणुकीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. दर उर्वरित भागात पाठवणुकीच्या केळीचे कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत शिवार किंवा थेट खरेदीत खानदेशात आहेत.

रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारातील शहादा भागांतील केळी काढणी सुरू आहे. सध्या खानदेशात धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर भागात केळीची आवक होत आहे. खानदेशातून ९० टक्के केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. दिल्ली, हरियाना येथील मॉल्समध्ये केळीची मागणी कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT