Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Price: केळी दरात सुधारणा

Banana Market Update: काही दिवस दबावात असलेल्या केळीदरात मागील काही दिवसांत एक क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात केळी दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: काही दिवस दबावात असलेल्या केळीदरात मागील काही दिवसांत एक क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात केळी दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तर सरासरी दर पातळीदेखील १५०० रुपयांवर आहे.
केळी दरात मोठी घसरण मध्यंतरी झाली. किमान दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे खाली आले होते.

महिनाभरापूर्वी दर १३०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर्जेदार केळीस मिळत होते. परंतु अधिकची आवक व कमी उठाव यामुळे दरात सतत घसरण झाली. दर नीचांकी म्हणजेच ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. कमी दर्जाच्या केळीचे दर ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. निर्यातीच्या केळीचे दरही १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

केळी दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी सुरू झाली. या स्थितीत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु रावेर, चोपडा आदी बाजार समित्या बघ्याची भूमिका घेत होत्या. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी दरपातळी घसरली होती. तेथे किमान ६०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस मागील आठवड्यात होता.

बऱ्हाणपूरच्या बाजारात केळीची आवक वाढली होती. तेथील आवक प्रतिदिन सरासरी १३० ट्रक एवढी आवक मागील आठवड्यात होती. परंतु तेथे केळी आवकेत सध्या काहीशी घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही केळी आवकेतील वाढ थांबली आहे. सध्या जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी २८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

खानदेशातील एकूण आवक ३५० ट्रकपेक्षा अधिक आहे. ही आवक एप्रिलच्या अखेरिस प्रतिदिन ४०० ट्रकपेक्षा अधिक होती. केळी आवकेत घट झाली आहे. दुसरीकडे बाजारात द्राक्षे, कलिंगड, खरबूज आवक घटली आहे. याचाही सकारात्मक परिणाम केळी दरवाढीसंबंधी झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT