Banana Export : नांदेड जिल्ह्यात केळी निर्यात सुविधा केंद्र उभारणार

Banana Farming : नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या केळीला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Banana Export
Banana ExportAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यातील अर्धापूर शिवारात केळी केळी निर्यात सुविधा केंद्र उभारण्यासह कासराळी येथे मिरची व सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याची मागणी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत करण्यात आली. यावेळी आनुषंगिक योजना तसेच त्यातील कामाबाबत अहवाल संबंधित यंत्रणांनी सादर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे गुरुवारी दिशा समितीची बैठक खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. बैठकीत सुरवातीला ३ जुलै २०२३ रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्यास मान्यता देण्यात आली.

Banana Export
Banana Export: निर्यातीच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटल दर

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या विविध योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील धर्माबाद, नायगाव, बिलोली या तालुक्यात लाल मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु या पिकाबाबत शेतकऱ्यांना बाजार मिळत नाही, तसेच त्यावर प्रक्रिया होत नाही. यामुळे कासराळी (ता. बिलोली) येथे कृषी विभागाच्या प्रक्षेत्रावर मिरची संशोधन केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

Banana Export
Banana Export : आखाती आयातदारांना जुन्नरच्या केळीची गोडी

याबाबतही सकारात्मक चर्चा होऊन तसा प्रस्ताव तयार करण्याचे सांगण्यात आले. बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट सुविधा तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर स्थापन करण्याबाबत, महामार्गाच्या पायाभूत सुविधा, दूरसंचार पायाभूत सुविधा कार्यक्रम, खाण पायाभूत सुविधा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी, वैयक्तिक सिंचन विहिरी, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, माध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, अमृत मिशन २.०, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, सर्व शिक्षा अभियान या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

अध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करून उपयुक्त सूचना केल्या.

केळी निर्यात सुविधा केंद्र उभारण्याची मागणी

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या केळीला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत यापूर्वीही केळी उत्पादकांनी अर्धापूरला केळी निर्यात सुविधा केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी दिशा समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. खासदार रवींद्र चव्हाण यांनी या मागणीला प्रतिसाद देत तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com