Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मलकापुरात मक्याला सरासरी २३०० रुपयांचा दर

Maize Rate : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला मागणी असल्याने दरांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

 गोपाल हागे

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला मागणी असल्याने दरांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आवक कमी असून सरासरी दर २३०० रुपयांवर पोहोचला आहे.

विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात मक्याची सर्वाधिक लागवड होत असते. खरीप, रब्बी या दोन्ही हंगामांत या जिल्ह्यातील शेतकरी मक्याचे पीक घेतात. खरिपाचे नियोजित क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत आहे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या बहुतांश मक्याची विक्री मलकापूर बाजारातून केली जाते.

प्रामुख्याने बुलडाणा, मोताळा, नांदुरा, मलकापूर तसेच खानदेशातीलही काही तालुक्यांतून याठिकाणी मका विक्रीला येत असतो. या ठिकाणी मक्याचे खरेदीदार अधिक असून बाहेरचेही व्यापारी मालाची खरेदी करीत असतात.

चांगल्या मक्याला दरही चांगला मिळतो. सोमवारी (ता. १) या बाजार समितीत आलेला मका कमाल २४७० रुपयांनी विकला गेला. किमान दर २२०० रुपये होता. सरासरी दरांचा विचार केला तर २३२० रुपये दर मिळाला. बाजारात आवक १०० क्विंटलच्या आत झाली होती.

नवीन हंगामाला अद्याप बरेच दिवस वेळ आहे. रब्बी, अर्धरब्बी हंगामात काढणी झालेला मका सध्या विक्रीला येत आहे. पेरण्यांच्या कारणाने बाजारात आवकेवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.

तीळ विकतोय ११ हजारांवर

मलकापूर बाजार समितीत तिळाला ११ हजारांवर दर मिळतो आहे. तिळाचा कमाल दर ११६२५ तर किमान ११२५० रुपये मिळाला होता. सरासरी ११३०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला. बाजारात तिळाची सहा पोते आवक झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT