Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : अकोल्यात हरभरादर सरासरी ७२०० रुपये

Chana Rate : उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये हरभऱ्याचा स्टॉक संपला असून शासनानेही साठा केलेला माल मध्यंतरी विक्रीत काढला.

Team Agrowon

Akola News : उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये हरभऱ्याचा स्टॉक संपला असून शासनानेही साठा केलेला माल मध्यंतरी विक्रीत काढला. यामुळे मागणी वाढल्याने स्थानिक हरभऱ्याचा दर सरासरी प्रतिक्विंटल ७२०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही तेजी दिवाळीपूर्वी महिनाभर आधीच आल्याने किती दिवस टिकेल, दरात आणखी काय चढ-उतार होतील, हे येत्या काही दिवसांत दिसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

बाजारांमध्ये हरभऱ्याची आवक सध्या बरीच कमी झाली आहे. त्यात दुसरीकडे हरभऱ्याच्या दरात जुलैच्या तुलनेत सुमारे हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. सोमवारी (ता. २६) अकोला बाजार समितीत हरभरा किमान ६२६५ आणि कमाल ७६१० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. सरासरी ७२०० रुपयांचा हरभऱ्याचा भाव होता. आवक १२९ पोत्यांची झाली होती.

साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात हरभरा सरासरी ६२५० रुपयांपर्यंत विकला गेला होता. त्या वेळी आवक बऱ्यापैकी सुरू होती. आता गेल्या काही दिवसांत मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये हरभऱ्याची मागणीच्या तुलनेत टंचाई सुरू आहे.

कंपन्यांनी त्यांच्याकडील साठे मोकळे केले. केंद्र शासनानेही २०२२-२३ मध्ये स्टॉक केलेला माल मोकळा केला. शिवाय हरभऱ्याचे अपेक्षित उत्पादनही गेल्या हंगामात झाले नव्हते. याचा सारासार परिणाम हरभऱ्याच्या मागणी व दरांवर दिसून येत आहे.

आगामी रब्बी हंगामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल. त्याचा माल जानेवारी-फेब्रुवारीत येईल. दरम्यानच्या काळात दसरा, दिवाळीसारख्या सणांचा काळ आहे. या काळात हरभरा डाळ, बेसन व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढत असते. ऑक्टोबरमध्ये केंद्राकडून आयात होऊ घातलेल्या विदेशातील हरभऱ्यानंतर दरांमध्ये बदल होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT