Cotton Disease Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Disease : 'अल्टरनेरिया' बुरशीचे कपाशीवर आक्रमण

अतिवृष्टीनंतरही कपाशीची स्थिती समाधानकारक होती. दोन-तीन वेचण्या होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीवर अचानक ‘अल्टरनेरिया’ या बुरशी रोगाचे आक्रमण झाले.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : अतिवृष्टीनंतरही (Heavy Rain) कपाशीची स्थिती समाधानकारक होती. दोन-तीन वेचण्या (Cotton Picking) होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीवर अचानक ‘अल्टरनेरिया’ या बुरशी (Alternaria Fungus) रोगाचे आक्रमण झाले. याचा परिणाम फूल, पातीवर होणार आहे. त्यामुळे एका वेचीतच कापसाची उलंगवाडी होण्याचा धोका कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. तसेच चित्र आज अनेक शेतात दिसून येत आहे.

शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करीत आहेत. या संकटांतून अन्नदाता स्वतःला सावरत आहे. यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस, पूर, परतीचा पाऊस आदी संकटांना तोंड दिले. पावसामुळे आलेला मररोग, गोगलगाईचे आक्रमण, किट अशा संकटांचाही मुकाबला केला. पीककाढणीवर असताना परतीच्या पावसाने परत एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावला. तरीही अनेक कष्ट घेऊन शेतकऱ्यांनी पीक वाचविले.

सद्यःस्थितीत कपाशी चांगली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेले नुकसान कपाशीतून काही प्रमाणात दूर होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. आता अचानक कपाशीवर ‘अल्टरनेरिया’ या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे उत्तम स्थितीत असलेली कपाशी लालसर, पिवळसर दिसत आहे. हा प्रादुर्भाव ठराविक क्षेत्रात नसून, सर्वदूर दिसून येतो.

बुरशीमुळे लाल्यारोगाचा प्रादुर्भाव होत असून कपाशीची पाने गळून पडत आहेत. पानातील कर्मग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावल्याने त्यांचा परिणाम झाडावर दिसतोय. विशेष म्हणजे, पानगळीनंतर नवीन फूल, पाती येण्याची शक्यता फार कमी असल्याचे मत शास्त्रज्ञांचे आहे. या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. कपाशीचे भाव वाढत असताना आता एका वेचीतच कापूस गेल्यास या हंगामातील सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वाढली आहे.

विशेष म्हणजे, बुरशीचा प्रादुर्भाव सर्व जिल्ह्यांत दिसून येतो. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट येत आहे. हंगाम संपताना संकटांची मालिका सुरूच आहे. शेवटच्या टप्प्यात कपाशीवर झालेला प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अल्टरनेरिया या बुरशीचा प्रादुर्भाव अचानकपणे कपाशीवर वाढताना दिसतोय. या बुरशीपासूनच लाल्या रोग पसरतो. काही भागांतील निरीक्षण पाहता एका वेचीतच कापूस संपणार आहे. नवीन फुले, पाती येण्याची शक्यता कमी आहे. बुरशीनाशक फवारणी करून ती कमी करता येते. ही बुरशी हवेतून पसरणारी असल्याने सर्वच भागांत हा प्रादुर्भाव आहे.
डॉ. प्रमोद यादगीरवार, शास्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT