Wheat Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Market : खानदेशात गव्हाची आवक वाढली

Wheat Arrival : खानदेशात गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, स्थानिक व पंजाबमधून आलेले हार्वेस्टर दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करीत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, स्थानिक व पंजाबमधून आलेले हार्वेस्टर दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करीत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. विविध बाजार समित्यांत मिळून सध्या रोज साडेचार हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर या बाजार समित्यांत रोज दोन हजार क्विंटलवर गहू आवक होत आहे. दर २३०० ते ३०५० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. दरात फारशी वाढ झालेली नाही. आवक या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली.

सुरुवातीला खानदेशात प्रतिदिन दीड हजार क्विंटल एवढी आवक होती. या कालावधीत दरही ३१०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक असे कमाल पातळीपर्यंत होते. या महिन्यात आवक टिकून राहणार आहे.

खानदेशात बागायत भागात विशेषतः चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, अमळनेर, साक्री, शिरपूर, शहादा, चोपडा आदी तालुक्यांत गव्हाची मोठ्या प्रमाणावरील क्षेत्रावर गव्हाची पेरणी होते. मात्र या वर्षी ही लागवड काहीशी घटली आहे. दरात मोठी घट झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा, धुळे, नंदुरबारातील शहादा, नंदुरबार या बाजारांत गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

चोपडा बाजारात सुमारे ७०० क्विंटल आवक होत असून, भाव २४०० ते २८०० दरम्यान आहेत, तर अमळनेर बाजार समितीत सुमारे दोन हजार क्विंटलची आवक होत असून, भाव २३५० ते तीन हजार रुपये दरम्यान आहेत. गव्हाची थेट किंवा खेडा खरेदी सुरू झाली असून, जागेवर गहू २४०० ते २६०० रुपये प्रमाणे विक्री होत आहे.

कोरडे वातावरण फायदेशीर

सध्या कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ होऊ लागल्याने गहू काढणीस गती मिळाली आहे. तापमानात वाढ झाली असल्याने गहू पीक कोरडे होत असून, हे वातावरण पिकासाठी चांगले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढ झाल्याचे दिसून येत असून, त्यामुळे गहूदेखील चांगला पद्धतीने कोरडा होत असल्याने शेतकऱ्यांना गहू काढणे सोयीची होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT