Coconuts Import Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Coconuts Import : अडीच हजार क्‍विंटल नारळांची आवक

एपीएमसीत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून दररोज अडीच हजार क्विंटल नारळाची आवक होत असल्याने दर नियंत्रणात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

वाशी ः सणासुदीच्या काळात नारळाला मागणी (Coconut Demand) वाढत असते. अशातच एपीएमसीत कर्नाटक, (Karnataka) आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून दररोज अडीच हजार क्विंटल नारळाची आवक (Coconut Import) होत असल्याने दर (Coconut Rate) नियंत्रणात आले आहेत.

दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे उत्सव, सणांवर निर्बंध होते. त्यामुळे नारळाच्या मागणीत घट झाली होती. यंदा निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याने नारळाच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र बाजारात आहे.

सध्या किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २५ ते ४० रुपये दरम्यान आहे. अशातच नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरात तोरण वाहण्याची प्रथा आहे. शिवाय दसऱ्यालादेखील नारळाचा वापर होत असल्याने मागणी असल्याने बाजारात नारळाची आवक वाढल्याची माहिती व्यापारी सुरेंद्र शहा यांनी दिली आहे.

दर्जा आणि आकारानुसार नारळाचे भाव निश्‍चित केले जातात. कोणत्‍याही शुभकार्याची सुरुवात श्रीफळ वाढवून केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्याला नारळाचा मानही मोठा असतो.

उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर

नवरात्रीला उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांचा वापर केला जातो. कर्नाटकातून या नारळांची आवक झाली. या नारळाला केटरिंग तसेच उपाहारगृह चालकांकडून मागणी असते; तर तमिळनाडूतून नव्या नारळाची आवक होत असून आंध्र प्रदेशातून पालकोल जातीच्या नारळांची आवक होत आहे.

घाऊक बाजारातील

नारळाचे शेकडा दर

नवा नारळ : १२५० ते १४५०

पालकोल : १४५० ते १५५०

सापसोल : १७०० ते २४००

मद्रास : २४०० ते २६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT