TMC Symbol Row: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये आधी उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) महत्त्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या दोन्ही गटांना पर्यायी नाव व चिन्ह बहाल करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ असे नवे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ चिन्ह दिले आहे. तर अरूप रॉय बंडखोर गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ असे नाव आणि ‘लिफाफा’ चिन्ह देण्यात आले आहे..अरूप रॉय गट हा पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. .पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला. त्यानंतर पक्षामध्ये फूट पडली. पक्षात दोन गट पडले. दोन्ही गटांनी पक्षावर दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. यावर तृणमूलचे दोन्ही गट पक्षाचे नाव आणि 'फुले व गवत' हे त्यांचे चिन्ह वापरू शकत नाही, असा अंतरिम आदेश निवडणूक आयोगाने दिला. पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पर्यायी पक्षाचे नाव आणि चिन्हाचे वाटप केले. .Shiv Sena Symbol Case: पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा: ॲड. कपिल सिब्बल.यामुळे दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने दिलेल्या वेगवेगळी नावे आणि चिन्हांनुसार लढवाव्या लागणार आहेत. जोपर्यंत पक्षातील अंतर्गत वादावर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. .नंदीग्राम आणि रेजीनगर येथे ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहे. तसेच पुढील काही महिन्यात कोलकाता महानगरपालिका आणि हावडा महानगरपालिकांच्या निवडणुकीचाही धुरळा उडणार आहे. .Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद .तृणमूल पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे ऋतब्रत बॅनर्जी यांनी स्वागत केले होते. एखादा राजकीय पक्ष हा कोणा एकाची खासगी कंपनी असूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते..'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी अन् आता तृणमूल काँग्रेस...'; राहुल गांधींची सरकारवर टीकानिवडणूक आयोगाच्या या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस...प्रत्येक वेळी एकच पॅटर्न- भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडतात. त्यानंतर पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेतात. जेव्हा संपूर्ण पक्षाची चोरी होऊ शकतो, तेव्हा लाखो भारतीयांची 'व्होट चोरी' होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही,'' अशा शब्दांत राहुल यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. .ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक मतदाराची आहे. ज्यांना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक हवी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.