Cashew Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : आजरा बाजारपेठेत काजू बीची आवक

Cashew Rate : काजू बीची येथील बाजारपेठेत आवक सुरू झाली आहे. शुक्रवारच्या (ता. ५) आठवडा बाजारात एक टन काजू बीची आवक झाली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : काजू बीची येथील बाजारपेठेत आवक सुरू झाली आहे. शुक्रवारच्या (ता. ५) आठवडा बाजारात एक टन काजू बीची आवक झाली. महिना अखेरीस बाजारपेठेत काजू बीची उलाढाल वाढणार आहे. दराबाबत शेतकऱ्यांत अजूनही संभ्रम आहे. काजू बीला प्रतिकिलो ९० रुपये दर मिळाला मात्र शेतकऱ्यांना जादा दर मिळण्याची अपेक्षा आहे.

मार्च महिना संपला तरी बाजारपेठेत काजू बीची अपेक्षित आवक झालेली नाही. व्यापाऱ्यांनी गत आठवड्यापासून काजू खरेदीला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या बाजारात बऱ्यापैकी काजू बीची आवक झाली. सुमारे दहा-बारा व्यापाऱ्यांनी काटे लावले होते. दिवसभरात सुमारे एक टन काजू बी जमा झाले.

गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने काजूचा लाग कमी राहिला आहे. पहिला बहर पुरेसा झाला नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे दुसऱ्या बहरावर शेतकऱ्यांची अपेक्षा टिकून आहे. पहिला बहर चांगला न झाल्याने उत्पादनात ५० टक्के घट होणार आहे. यंदा काजूचे पीक शेतकऱ्यांना हात देईल का नाही हे एप्रिलअखेरच्या टप्प्यात स्पष्ट होईल, असे कृषी अधिकारी विजयसिंह दळवी यांनी सांगितले.

काजूच्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. गत आठवड्यापासून प्रतिकिलो ९० रुपये दर राहिला आहे. पुढे दर वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे. कोकणात प्रतिकिलो दर १०५ रुपयांपर्यंत आहे. हा दर प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत जाईल, असे जाणकार सांगतात. आजरा, चंदगड परिसरातील स्थानिक काजू बीचा दर वाढल्यास बाजारपेठेत आवक वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वळीव पावसाची प्रतीक्षा

यंदा तालुक्यात वळीव पावसाने पाठ फिरविली आहे. मार्च महिना संपला तरी वळीव पाऊस झाला नाही. वळवाचा पाऊस झाल्यास काजूला चांगला बहर येऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वळीव पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT