Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : आगाप कांदेबाग केळीची आवक सुरू

Banana Arrival : खानदेशात आगाप लागवडीच्या कांदेबाग केळी बागांमधून केळीची आवक सुरू झाली आहे. दर कमाल १९०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात आगाप लागवडीच्या कांदेबाग केळी बागांमधून केळीची आवक सुरू झाली आहे. दर कमाल १९०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. यंदा आगाप बागांमधून आवक वेळेत सुरू झाली असून, केळीचा तुटवडा असल्याने दर टिकून राहतील, असे दिसत आहे.

खानदेशात केळीची आवक मागील दीड महिन्यापासून सतत कमी होत आहे. मागील महिन्याच्या मध्यापर्यंत जुनारी (केळीची ९० ते ९५ टक्के काढणी पूर्ण झालेल्या केळीबागा), पिलबागांमधून (खोडवा) केळीची आवक सुरू होती. परंतु मागील चार ते पाच दिवसांत आगाप कांदेबाग केळीबागांमधूनही आवक सुरू झाली असून, दर्जेदार केळीची काश्मीर, उत्तर प्रदेशात पाठवणूक सुरू आहे. कमाल १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या केळीला मिळत आहे.

सध्या आगाप कांदेबाग केळीमधून रोज १५ ते २० ट्रक केळीची (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक होत आहे. ही आवक पुढील पंधरवड्यात आणखी वाढेल. कांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगावमधील चोपडा, जळगाव, यावलमधील काही भाग, जामनेर, भडगाव-पाचोरा, धुळ्यातील शिरपूर या भागांत अधिक असते. नंदुरबारात कांदेबाग केळी अल्प किंवा अपवादानेच लागवड केली जाते. अनेक शेतकरी फ्रूटकेअर तंत्र व उत्तम व्यवस्थापन करीत असून, दरांसाठी आगाप लागवडदेखील करतात.

या क्षेत्रातून आवक सुरू झाली आहे. चोपडा, यावलमधील पश्चिम भाग, जळगाव, जामनेर, शिरपूर या भागांत आवक सुरू आहे. खरेदीदार या केळीची श्रीनगर येथे पाठवणूक करीत आहेत.

तसेच पंजाब व उत्तर प्रदेशातील मॉल्समध्येदेखील ही केळी पाठविली जात असून, सुरुवातीला चांगले दर आहेत. दर्जेदार केळी या बागांमधून येत आहे. क्षेत्रातच किंवा फिल्ड पॅकिंग केली जात आहे. बॉक्समध्ये पॅकिंग करून या केळीची पाठवणूक केली जात आहे.

जुनारी, पिलबाग केळीमधून खानदेशात सध्या रोज ९० ते ९४ ट्रक केळीची आवक होत आहे. या केळीसही उत्तरेकडे उठाव आहे. तसेच जळगाव, धुळ्यातून परदेशात रोज तीन ते चार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक खरेदीदार करीत आहेत.

या केळीचे दरही १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीची आवक पुढील सात ते आठ दिवसांत जुनारी व पिलबाग केळीमधून कमी होईल, असेही सांगितले जात आहे. कारण जुनारी बागांतही काढणी पूर्ण होत आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात नरमाई; केळीला उठाव, कापूस दरावर दबाव, गवार तेजीत, तर ज्वारीला मागणी कायम

Ganeshotsav 2025: माटवी सजविण्याच्या खरेदीकरिता ग्राहकांची झुंबड

Alu Blight Disease: अळू पिकावरील करपा रोगाचे व्यवस्थापन

Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर

Onion Cultivation: खानदेशात कांदा पीक स्थिती बरी; पावसामुळे सिंचन बंद

SCROLL FOR NEXT