Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize : मका ‘हब’वर लष्करी अळीचे आक्रमण

मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात साधारणतः मका पिकाची सर्वाधिक पेरणी केली जाते. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण एक लाख ७७ हजार २८७ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ६७ हजार ४२६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्याला ‘मका हब’ (Maize Hub) म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (Army worm Outbreak On Maize) प्रादुर्भाव आढळून आला आहे. तज्ज्ञांनी जुलै, ऑगस्टमध्ये पाहणी केलेल्या गावांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असल्याची बाब तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात साधारणतः मका पिकाची सर्वाधिक पेरणी केली जाते. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण एक लाख ७७ हजार २८७ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ६७ हजार ४२६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. दुसरीकडे जालना जिल्ह्यात सर्वसाधारण ५३,०५१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३५ हजार ९०१ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६७ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली.

बीड जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र अकरा हजार ३४३ हेक्टर असून, त्यापैकी ५७ टक्के क्षेत्रावर म्हणजे ६५० हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तीनही जिल्हे मिळून सर्वसाधारण दोन लाख ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ९८७७ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८६ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. जवळपास १४ प्रत्येक क्षेत्रावर अपेक्षित मक्याची पेरणी झाली नाही हे विशेष.

पाहणीतील ७ गावांत प्रादुर्भाव जास्त

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या कीटकशास्त्रज्ञांसह सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर केलेल्या पाहणीत वैजापूर तालुक्यातील साकेगाव, तात्याचीवाडी उंदीरवाड, सजनापूरवाडी, खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आदी गावांमध्ये केलेल्या पाहणीत अमेरिकन लष्करी अळीने मक्यावरील प्रादुर्भाव आणि आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली होती.

असे करते नुकसान...

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते. त्यामुळे पानावर पारदर्शक पांढरा पॅच दिसतो. अळी कोवळी पाने पोंग्यात शिरून खाते. त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात. अळीची विष्टा पोंग्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. वाळलेली विष्टा लाकडाच्या भुशासारखी दिसते. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत अळी कणसाभोवतीची कोवळी पाने खाते व त्यानंतर कोवळे दाणे खाते. व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र

SCROLL FOR NEXT