Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : ‘अपेडा’कडून युरोपात प्रथमच केळीची समुद्रमार्गे निर्यात

APEDA Agriculture Export : कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)तर्फे समुद्रामार्गे प्रथमच भारतातून युरोपला केळीची निर्यात करण्याचा प्रयत्न झाला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)तर्फे समुद्रामार्गे प्रथमच भारतातून युरोपला केळीची निर्यात करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासंबंधीचा कार्यक्रम नुकताच दौंड (जि. पुणे) येथे एका केळी निर्यातदार कंपनीच्या पॅकहाउसमध्ये झाला.

युरोपियन बाजारपेठेतील भारतीय केळीचा बाजारपेठेतील वाटा वाढविण्याच्या उद्देशाने ‘अपेडा’ने निर्यातीसंबंधी केलेला हा महत्त्वाचा प्रयत्न किंवा प्रयोग असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातून युरोपमध्ये केळीची मोठी निर्यात करण्याचा ही सुरुवात आहे. देशातील केळी उत्पादक व कृषिनिर्यात क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ‘अपेडा’ने म्हटले आहे.

युरोपात १९.५० टन केळी पाठविण्यात आली. ‘आयएनआय फार्म्स प्रा.लि.’ या कंपनीने ही निर्यात केली आहे. याच कंपनीच्या वासुंदे (ता. दौंड, जि. पुणे) येथील पॅकहाउसवर केळी पाठवणुकीसंबंधी कार्यक्रम झाला. वासुंदे येथून केळीची कंटेनरद्वारे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे पाठवणूक करण्यात आली. तेथून समुद्रामार्गे केळी युरोपात जाईल.

‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी या कार्यक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. या वेळी ‘अपेडा’च्या भाजीपाला व फळे विभागाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू, उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांच्यासह शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतिशील केळी उत्पादक आणि ‘आयएनआय’ फार्मचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पावसाचा येलो, ऑरेंज अलर्ट; विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जागर

Natural Farming Campaign: अडीच हजार कोटींचे अभियान केंद्र सरकार राबविणार; २३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार प्रारंभ

Natural Farming : रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता, माणसांचे आरोग्य धोक्यात

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT