Ginger Harvesting Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Market Rate : आले पिकांस प्रतिगाडीमागे पाच हजार रुपयांची वाढ

आले बियाणे खरेदी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या आले पिकांच्या दरात पुन्हा सुधारणा होऊ लागली आहे.

विकास जाधव 

Satara News आले बियाणे खरेदी (Ginger Seed Procurement) करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या आले पिकांच्या दरात (Ginger Rate) पुन्हा सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आले (धुणीच्या) पिकांस प्रतिगाडी (५०० किलो) ३० ते ३५ हजार रुपये दर मिळत आहे. आल्यास प्रतिगाडीमागे सुमारे चार ते पाच हजार रुपयांनी दर वाढला आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादकांना दरातील सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे. आले पिकांस नोव्हेंबरपासून सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. जानेवारी महिन्यात प्रतिगाडी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर टप्पाटप्प्याने दरात सुधारणा होत गेली.

२१ ते ३१ मार्च या काळात खरेदी कमी झाल्याने दर घटले होते. पुढील काळात दरात घसरण होईल, असे वातावरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आले विक्रीस प्राधान्य दिले होते. मात्र एप्रिल सुरू झाल्यापासून पुन्हा दर वाढत आहेत.

सध्या आले पिकांच्या प्रतिगाडीस ३० ते ३५ हजार रुपये दर मिळत आहे. दर्जेदार, निरोगी आले असेल तर प्रतिगाडीस ३० ते ३५ हजार, तर मुळकुजीचा प्रादुर्भाव असल्यास दर कमी अशी स्थिती आहे. सातारा बाजार समितीत आल्याची २२ क्विंटल आवक झाली. प्रति दहा किलोस ३०० ते ६०० रुपये दर मिळाला.

आले ठेवण्यावर भर

सध्या आले पिकांची टंचाई दिसून येत आहे. यामुळे पुढील काळात दरात वाढ होईल किंवा दर टिकून राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याची विक्री न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

आले जमिनीत ठेवल्यावर त्यांची वाढ सुरू होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकरी आले ठेवत आहेत. यामुळे कधी नव्हे ते व्यापारी आले घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे लागल्याचे चित्र आहे.

बियाणे खरेदी अंतिम टप्प्यात

आले बियाणे काढणी सुरू असताना दरात आणखी वाढ झाली होती. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडीस होते. यावेळी धुणीच्या आल्याचे दर २८ ते २९ हजारांवर होते. सध्या बियाणे खरेदी अंतिम टप्प्यात आहे. बियाण्याचे दर तेजीत असल्याने खरेदी कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Rate: कापूस उत्पादकांना बांगलादेश झटका देणार? भारतातून सूत आयातीवर शुल्क लावण्याच्या हालचाली

Pesticides Management Bill: कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी, केंद्राने सूचना मागवल्या

Agrowon Podcast: सोयाबीन दर टिकून, कापसात सुधारणा, गव्हाचे दर स्थिर, लाल मिरचीची आवक वाढली,हरभरा दबावातच

Cotton Growers: प्रक्रिया उद्योजकांनी साधला कापूस उत्पादकाची संवाद

Kolhapur Cooperative Banks: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीदार, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची शासनाने मागविली माहिती

SCROLL FOR NEXT