Ginger Market : आल्यावर प्रक्रिया करण्याची गरज

आलं उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी केवळ थेट वापरावर अवलंबून चालणार नाही. तर आल्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
Ginger Market News
Ginger Market NewsAgrowon

Ginger Farming: आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रोजच्या आहारात आल्याचा (Jinger) उपयोग होतो. जगात चीन आलं आघाडीवर आहे. तर चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. देशाचा विचार करता आसाममध्ये आलं पीक (Jinger Crop) जास्त घेतलं जातं.

आले उत्पादनात देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. असं असतानाही प्रक्रिया उद्योग (Processing Industry) नसल्यामुळे आल्याला चांगला दर मिळत नाही.

आल्याचं पीक किमान नऊ महिने जमिनीखाली असतं. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकतात. वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पादनात घट होते.

उत्पादन खर्चही भरून निघत नाही. राज्यात आल्याची लागवड प्रामुख्याने एप्रिलपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत केली जाते.  

आलं उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी केवळ थेट वापरावर अवलंबून चालणार नाही. तर आल्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे.

देशात आणि राज्यात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली नाही, त्यामुळं आल्याचा वापरही मर्यादीत राहिला. याचा फटका आले उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय.

आले पिकात औषधी गुणधर्म असल्याने औषधांसाठी वापर केला जातो. मात्र असा वापर मर्यादीत आहे. आल्यापासून आले पावडर, तेल, कॅंडी, बिअर, पेस्ट आदी प्रकारच्या पदार्थांचं उत्पादन होऊ शकतं. 

Ginger Market News
Ginger Market : आले दरात घसरणच अधिक...

नेहमीच्या जेवणात आल्याचा सर्रास वापर केला जातोच. याशिवाय  आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आले लसूण पेस्ट, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. यामुळे आल्याला बहुगुणकारी आणि बहुउपयोगी म्हणतात. 

Ginger Market News
Ginger Market : आले पिकाला हवा प्रक्रियेचा आधार

सुकविलेल्या आल्याला सुंठ म्हणतात. मलबार पद्धत आणि सोडा खार पद्धत अशा सुंठ बनविण्याच्या दोन पद्धती आहेत.

उत्तम प्रतिची पांढरी व आकर्षक सुंठ तयार करण्यासाठी गंधकाची धुरी दिली जाते. याशिवाय आल्यापासून बनवलेल्या कॅन्डीलाही चांगली मागणी आहे.

कॅन्डी तयार झाल्यानंतर उरलेल्या पाकापासून सिरप बनवले जाते. आल्यापासून बनविलेल्या सुपारीमुळे शरीराची पाचनक्षमता वाढण्यास मदत होते तसचं पित्तसुद्धा कमी होतं.

आल्याच्या पावडरचा उपयोग ओलीओरेझीन तसचं तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. आल्यापासून जवळजवळ दीड ते साडेतीन टक्के तेल मिळते.

वाळवलेल्या आल्याची पावडर वापरून वाफेच्या ऊर्ध्वपातन पद्धतीने आल्याचे  तेल काढले जाते. हे तेल फिकट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे असते. या तेलाला  विशिष्ट प्रकारचा स्वाद व मसालेदार वास असतो. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com