Tea Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tea Producer Assam : आसाममधील छोट्या चहा उत्पादकांच्या सशक्तीकरणाचा प्रयत्न

Tea Production : ईशान्येकडील आसाम हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आसाममधील छोटे चहा उत्पादक गेल्या २०० वर्षांपासून येथील चहा उद्योगाचा कणा बनले आहेत.

Team Agrowon

Tea Production : ईशान्येकडील आसाम हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आसाममधील छोटे चहा उत्पादक गेल्या २०० वर्षांपासून येथील चहा उद्योगाचा कणा बनले आहेत.

मात्र, दीर्घकाळापासून त्यांना चहासाठी किफायतशीर किंमत न मिळणे, पुरेशा संसाधनांचा अभाव आणि बाजारपेठेत मर्यादित प्रवेश आदी आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

या आव्हानांवर मात करण्यासाठी ‘स्मार्ट टी व्हिलेज’च्या माध्यमातून व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्यातून सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून शाश्वत उपायांतून छोट्या चहा उत्पादकांच्या सशक्तीकरणाकडे पाऊल टाकले आहे.

या चहा उत्पादकांसाठी चहा मंडळाच्या उपक्रमांना पूरक म्हणून ‘त्रिनिटिया’ या नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक शतद्रू चट्टोपाध्याय म्हणाले, की मूल्य शृंखला पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून स्पर्धात्मकता वाढविण्याचा हेतू यामागे आहे. आसाममध्ये सव्वा लाख चहा उत्पादक असले तरी त्यांना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

आम्ही ‘स्मार्ट टी व्हिलेज’च्या माध्यमातून या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. छोट्या चहा उत्पादकांना चांगल्या शेतीसाठी तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय पद्धतींच्या सरावासाठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील प्राथमिक हेतू आहे.

यामुळे चहाच्या पानांचा दर्जा सुधारून या उत्पादकांना अधिक चांगले दर मिळतील. या उपक्रमात सहा दृष्टिकोनांचा स्वीकार करण्यात आला आहे. त्यात हवामान, पाणी, कार्बन, ज्ञान आणि ऊर्जा व बाजारपेठेचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत खराब झालेली माती पुनर्संचयित करून पाण्याचा तसेच खतांचा वापर कमी करून उत्पादकता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

छोट्या चहा उत्पादकांकडे कृषी क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहितीचा अभाव असतो. त्यामुळे, संबंधित गावांत आसाम कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे ज्ञान दूरध्वनीच्या माध्यमातून व नियमित प्रशिक्षणातून पोचविले जाईल.

आम्ही जीवाश्म इंधनासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी सौर आणि बायोगॅस संयंत्रांच्या अधिक वापरावर भर देत आहोत. त्यातून छोट्या चहा उत्पादकांच्या उत्पादनाचा खर्च कमी होऊन त्यांना अधिक चांगली किंमत मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

वरिष्ठ सल्लागार गंगन बोरिया म्हणाले, की हा उपक्रम संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार असला तरी आसामवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ६० टक्के चहा उत्पादकांपर्यंत पोचलो आहोत.

त्यात तिनसुखिया, दिब्रूगड, जोरहाट आणि उदयगुडी आदी जिल्ह्यांतील चहा उत्पादकांचा समावेश आहे. चहाच्या पानांच्या निकृष्ट दर्जाबद्दल नेहमी तक्रार केली जाते. त्यामुळे, चहा उत्पादकांना स्वमदत गट स्थापन करून अधिक चांगल्या कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

आसाममधील छोटे चहा उत्पादक

१.२२ लाख

एकूण टक्केवारी

५२ टक्के

मी गेल्या दोन वर्षांपासून या उपक्रमाशी संबंधित आहे तसेच तज्ज्ञांकडून नियमितपणे प्रशिक्षणही घेतले आहे. मी चहाच्या मळ्यातील मातीचे परीक्षण केले असून तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पूर्वीपेक्षा खतांचा वापर निम्मा करून चहाचे अधिक उत्पादन घेतले आहे.
- दिलीप साईकिया, चहा उत्पादक, आसाम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT