Amul
Amul Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Amul: अमूलची उलाढाल पोहोचली ६१ हजार कोटींवर

टीम ॲग्रोवन

अमूल (Amul Dairy) या ब्रॅँडनेमने दुधाची विक्री (Milk Sell) करणाऱ्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने २०२१-२२ मध्ये तब्बल ६१ हजार कोटी रूपयांची उलाढाल (Amul Dairy Turnover) केली आहे. महासंघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

गुजरातमधील १८ सहकारी जिल्हा दूध संघ अमूलचे सभासद आहेत. अमूल हा जगातील आठव्या क्रमांकाचा दूध संघ आहे. अमूल यंदा ७५वे स्थापना वर्ष साजरे करत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात अमूलच्या उलाढालीत आठ हजार कोटी रूपयांची वाढ झाली. ही वाढ १८.४६ टक्के आहे. गेल्या मागील बारा वर्षांत सरासरी वाढ १६ टक्के होती. त्या तुलनेत यंदा अधिक वाढ झाली आहे.

कोविड नंतरच्या काळात घरगुती वापरासोबतच हॉटेल्स, केटरिंग, पर्यटन आणि संलग्न व्यवसायांमधून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने अमूलच्या उलाढालीने जोर पकडला, असे सांगण्यात आले.

मागील बारा वर्षात फेडरेशनच्या दूध संकलनात १९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना मिळालेल्या दरात जवळपास १४३ टक्क्यांची वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना विक्रमी दर दिल्यामुळे दुधाचे संकलन वाढल्याचे ‘अमूल'चे अध्यक्ष शामलभाई पटेल म्हणाले.

‘‘शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यामुळे त्यांनी या व्यवसायात गुंतवणूक वाढवत नेली. त्यामुळे दूध उत्पादन वाढले. शेतकऱ्यांना त्याचा चांगला परतावा मिळाला,'' पटेल म्हणाले.

क्षमतावाढीसाठी गुंतवणूक

अमूल आपली दूध प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी ८०० ते १००० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. दूध, दही आणि ताक यासारख्या ताज्या पदार्थांच्या निर्मितीची क्षमता वाढवली जाणार आहे. राजकोट येथे तब्बल ५०० कोटी रूपये गुंतवणुकीचा नवीन डेअरी प्रकल्प उभा राहत आहे. लवकरच दिल्लीजवळील बागपत, वाराणसी, रोहतक आणि कोलकाता येथेही मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे शामलभाई पटेल यांनी सांगितले.

दुधापासून तयार केलेल्या मिठाया आणि गोड पदार्थ किमान दीड महिना टिकावेत यासाठी एका नवीन तंत्रज्ञानावर सध्या अमूल काम करत आहे.

‘‘ऐन उन्हाळ्यात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत सापडूनसुद्धा अमूलच्या दुग्ध पेय उलाढालीमध्ये ३६ टक्के वाढ झाली. आईस्क्रीम व्यवसायाने जोरदार मुसंडी मारत ५० टक्के वाढ दाखवली. अमूल बटरमध्ये १७ टक्के, तर तुपाच्या व्यवसायात १९ टक्के वाढ झाली. सर्वाधिक खपाच्या अमूल दुधाच्या विक्रीत १२ टक्के वाढ झाली,'' असे फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी म्हणाले.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती करावी यासाठीही ‘अमूल'ने पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची तपासणी करून घेता यावी, यासाठी अमूल देशभरात प्रयोगशाळांची उभारणी करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT