Silk Farming
Silk Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Park : नेत्यांच्या श्रेयवादात रखडला अमरावतीचा रेशीम पार्क

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : दोन नेत्यांच्या राजकीय वर्चस्ववादात अमरावती येथे प्रस्तावित रेशीम कोष बाजारपेठ (Silk Cocoon Market) रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांत हा प्रश्‍न निकाली न निघाल्याने शेतकऱ्यांवर मात्र कोष विक्रीसाठी (Cocoon Sale) कर्नाटकसह राज्याच्या इतर भागांत जाण्याची वेळ आली आहे. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा नाहक खर्च होत आहे. (Silk Park Amravati)

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादकांची संख्या नजीकच्या काळात वाढीस लागली आहे. आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख असताना या नव्या व्यवसायाने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक समृद्धीचे निमित्त हा व्यवसाय ठरत आहे. नागपूर, वर्धा, अकोला, वाशीम, भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील रेशीम कोष व्यवसायाचा विस्तार झाला आहे.

रेशीम संचलनालयाने विदर्भातील कोष उत्पादकांसाठी बडनेरा येथे रेशीम कोष बाजार विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई -हावडा रेल्वे आणि रस्ते मार्गावर बडनेरा असल्याने देशाच्या विविध भागातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी येथील बाजार सोयीचा ठरला असता. त्यामुळेच रेशीम संचालनालयाने बडनेरा उपबाजार समितीची निवड केली होती. रेशीम संचलनाच्या अखत्यारितील रेशीम पार्क देखील बडनेरा उपबाजार समितीपासून जवळ आहे. त्यामुळे देशातील इतर भागांतून आलेल्या व्यापाऱ्यांच्या राहण्यासाठी रेशीम पार्कमध्ये सोय करणे शक्य झाले असते. त्यासोबतच्या ठिकाणी कोषावर प्रक्रिया करण्याची सोय देखील आहे. त्यामुळे बडनेरा हे ठिकाण निवडण्यात आले होते.

दरम्यान, बडनेरा येथे रेशीम बाजार विकसित झाल्यास त्याचे श्रेय या भागाचे आमदार रवी राणा यांना मिळेल, अशी शक्यता होती. त्यामुळेच तत्कालीन महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा बाजार अमरावती येथे किंवा त्यांचा मतदार संघ असलेल्या तिवसा येथे प्रस्तावित करावा, असा आग्रह धरला होता. नेत्यांच्या या श्रेयवादाच्या लढाईत गेल्या अडीच वर्षांत हा बाजार दोन्ही ठिकाणी होऊ शकला नाही. परिणामी, रेशीम कोष उत्पादकांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांना कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर किंवा राज्यातील इतर भागांत जावे लागते.

रेशीम कोष बाजारपेठेबाबत आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

आमदार यशोमती ठाकूर यांनीच हा मुद्दा श्रेयाचा केला. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत अमरावती, तिवसा किंवा इतर कुठेही हा बाजार झाल्यास त्याचे स्वागत केले असते. आमच्या स्तरावरून या बाजारासाठी कोणतीच आडकाठी नव्हती. हा बाजार होण्यासाठी प्रयत्न करू.
रवी राणा, आमदार, बडनेरा मतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT