Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : वीस लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्या

Sugar Market : साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणी आता केंद्रातील मंत्र्याकडूनच होत आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणी आता केंद्रातील मंत्र्याकडूनच होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून यंदाच्या हंगामात सुमारे २० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

साखर उद्योगातील विविध संस्थांनी यंदा साखरेचे उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजाच्या आधारे केंद्राने साखर निर्यातीस परवानगी द्यावी, असे श्री. चौधरी यांनी म्हटले आहे.

जर जादा साखर उत्पादित झाली तर साखरेच्या किमती कमी होऊ शकतात याचा फटका साखर कारखान्यांना होऊ शकतो. हे टाळण्यासाठी केंद्राने आतापासूनच साखर निर्यातीला परवानगी देण्याबाबत विचार करावा

‘इस्मा’ने यंदाच्या साखर हंगामाच्या प्रारंभी ९० लाख टन साखर शिल्लक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशांतर्गत गरज पूर्ण होऊन २०२४- २५ च्या अखेरीस सुमारे १३३ लाख टन साखर शिल्लक राहील. ती नेहमीच्या ५५ लाख टनाच्या राखीव कोट्यापेक्षा खूपच जास्त असेल. हा जादा होणारा साखर कोटा कारखान्यांचे व्यवस्थापन खर्च वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो, यामुळे कारखाने अडचणी येऊ शकतात.

अतिरिक्त साखरेचा दबाव येणार

जर केंद्राने साखर उद्योगाबाबत चर्चा करून सद्यःस्थितीचा आढावा घेतल्यास सर्वप्रथम निर्यातीस परवानगी देणे ही बाब महत्त्वाची ठरते. कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्षा अखेरीस होणारा अतिरिक्त साखरेचा दबाव टाळण्यासाठी यंदा वीस लाख टनाची साखर निर्यात करण्यास परवानगी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT