Ahilyanagar News: कांद्याची निर्यातबंदी उठवली असल्याचे सांगितले जात असले, तरी कांदा दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत काद्याचे दर प्रति क्विंटल किमान ३०० ते कमाल १५०० हजार रुपयांवर स्थिर आहेत. कांद्याला सध्या सरासरी १०५० ते ११०० रुपये दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.
अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके, तसेच घोडेगाव, पारनेर, राहुरी, कोपरगाव बाजार समितीत कांद्याची आवक बऱ्यापैकी होत असते. अहिल्यानगर बाजार समितीत सध्या दररोज गावरान कांद्याची १२ हजार ते २५ हजार क्विटंलपर्यंत आवक होत आहे.
शनिवारी (ता. ५) झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला किमान १२०० ते कमाल १५०० रुपये, दोन नंबरच्या कांद्याला किमान ९०० ते कमाल १२०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला किमान ६०० ते कमाल ९०० रुपये व चार नंबरच्या कांद्याला किमान ३०० ते कमाल ६०० रुपयांचा दर मिळाला. साधारणपणे १०५० ते ११०० रुपये सरासरी दर मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असल्याचे सांगितले. त्यानंतर कांदा दरात बऱ्यापैकी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून किमान ३०० रुपयांपासून कमाल १५०० रुपये क्विंटललवर दर स्थिर आहेत
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपबाजार समितीमध्ये कांद्याला रविवारी (ता. ६) सर्वाधिक १४२० रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला किमान १२५० ते कमाल १४२० रुपये. दोन नंबर कांद्याला किमान ११५० ते कमाल १३०० रुपये, तीन नंबर कांद्याला किमान ७५० ते कमाल ९५० रुपये, तर गोल्टी कांद्याला किमान ८०० ते कमाल १२०० रुपये भाव मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड अधिक प्रमाणात झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.