Tomato Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Tomato Market: टोमॅटो भाव या महिन्यात खरचं पडतील का?; टोमॅटो बाजाराचं चित्र कसं राहील?

Tomato Rate : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. तसेच पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढून दर कमी होतील, असा अंदाज सरकारसह काही संस्थांनी व्यक्त केला.

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः टोमॅटो बाजारात मागील दीड महिन्यापासून चांगलीच तेजी आली होती. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. पण उठाव चांगला राहीला. त्यातच पावसामुळे आवकेवर परिणाम दिसत होता. पण आता राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. तसेच पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढून दर कमी होतील, असा अंदाज सरकारसह काही संस्थांनी व्यक्त केला. 

बाजारातील टोमॅटो दरातील तेजी कायम आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला आजही ७० ते ९० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. तर किरकोळ विक्री १३० ते १५० रुपयांनी सुरु होती. गुणवत्तेच्या टोमॅटोचे भाव यापेक्षा जास्त होते. सध्या एप्रिल आणि मे महिन्यातील लागवडीचा माल बाजारात सुरु आहे. पण जुलैमध्ये तीन आठवडे अनेक टोमॅटो उत्पादक पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाली. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जून आणि जुलै महिन्यातील टोमॅटो लागवडी वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. हा माल दोन ते अडीच महिन्यांमध्ये बाजारात येण्यास सुरुवात होईल. पण मागील महिन्यात झालेल्या पावसाने काही भागांमध्ये टोमॅटो पिक आणि रोपांनाही फटका बसला. त्यातच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंडही हवामान विभागाने सांगितला. असे झाल्यास टोमॅटो पिकावर याचा परिणाम होऊ शकतो.

सरकार तसेच काही संस्थांनी टोमॅटोचे भाव ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कमी होऊ शकतात. भाव ३० रुपयांपेक्षा कमी होतील, असं सरकार आणि काही संस्थांनी सांगितलं होतं. पण सरकार आणि काही व्यापारी संस्थांनी सांगितलं त्याप्रमाणे आवक वाढण्याचा अंदाज कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. जुलै महिन्यातील पावसाने पिकाचे नुकसान झाले. जूनमध्ये पाऊस नसल्याने पिकाला फटकाही बसला. यामुळे आवकेत मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

अभ्यासू शतकरी आणि निर्यातदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. पण आवक सध्या आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. पण दरात मोठी घट होण्याची शक्यता कमीच दिसते. सरकार किरकोळ विक्रीचे भाव ३० रुपयांवर येईल, असं म्हणतंय, पण हे घडेल असं वाटत नाही. घाऊक भाव सध्याच्या ७० ते ९० रुपयांवरून निम्मा होऊ शकतो. म्हणजेच घाऊक भाव ३५ ते ४५ रुपयांपर्यंत राहू शकतो, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला. पण शेतकऱ्यांनी घाबरून बाजारात आवकेचा लोंडा आणू नये, असे आवाहनही केलं.

 --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT