Tur Market
Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : उद्योगांच्या या मागणीमुळं तुरीचे दर कमी होतील का?

Team Agrowon

Tur Rate Update : देशात तुरीचे दर तेजीत आहेत. सरकारच्या प्रयत्नांतरही तुरीच्या दरातील तेजी कमी होण्याचं नाव घेईना. उत्पादनाच कमी असल्याने दर वाढणं सहाजिकच आहे. मात्र शेतकऱ्यांचं काहीही झालं तरी चालेल पण महागाई कमी झाली पाहीजे, असं सरकारचं धोरण दिसतं.

सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रिया उद्योगांना यासाठी धारेवर धरतंय. मग आता उद्योगांनीही सरकारला तुरीचे भाव करण्याचा एक उपाय सूचवला. मध्यान्ह भोजन योजनेत सरकारने तुरीऐवजी इतर कडधान्याचा वापर वाढवावा, अशी मागणी इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशनने केली.

देशातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली. सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात देशातील तूर उत्पादन ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला. पण उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या मते तूर उत्पादन ३० लाख टनांपेक्षा अधिक नाही. उत्पादन घटल्यामुळे सरकारनं आयातीवर जोर दिला. त्यासाठी मुक्त आयात धोरण राबवलं.

पण आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमी असते. यामुळं सरकारला पुरवठा वाढवता येत नाही. गेल्या हंगामात भारतानं ८ लाख ५० हजार टन तुरीची आयात केली होती. यंदाही याचदरम्यान आयात होऊ शकते, असा अंदाज आहे.

तुरीचा पुरवठा यंदा मागणीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दर तेजीत आहेत. तुरीच्या वाढत्या दरानं सरकारची मात्र चिंता वाढवली. पुढीलवर्षी निवडणुका असल्यानं सरकार तुरीचे बाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतेय.

यासाठी सरकारने व्यापारी, प्रक्रियादार, स्टाॅकिस्ट आणि आयातदारांच्या स्टाॅकवर बारीक नजर ठेवली आहे. चुकीची माहिती देण्याऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. काहीही करून सरकारला तुरीचे दर कमी करायचे असल्याने उद्योगांनीही सरकारला एक उपाय सूचवला.

इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आयपीजीएने मधान्ह भोजन योजनेतून तुरीला वगळण्याची मागणी केली. असोसिएशनच्या मते यामुळं तुरीला मागणी कमी होऊन दरही कमी होऊ शकतात. मधान्ह भोजन योजनेसाठी सध्या सरकार केवळ तुरीसाठी टेंडर काढते.

पण असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी यांच्या मते, सरकारने तुरीऐवजी इतर कडधान्याचे ५ लाख टनांचे टेंडर काढावे. यामुळं तुरीचे दर कमी होण्यासाठी मदत होईल. तसचं सरकारनं इतर कडधान्याच्या निर्यातीसाठी अनुदानही द्यावे, अशी मागणी कोठारी यांनी केली.

आयपीजीएने केलेल्या या मागणीमुळं तुरीची मागणी कमी होऊ शकते. पण त्याचा दरावर फारसा परिणाम जाणवणार नाही. कारण यंदा तुरीचा तुटवडा जास्त आहे. तसेच यंदा माॅन्सूनवर अल निनोचा परिणामही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळं दर टिकून राहू शकतात.

सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपये दर मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील ही तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT