Rice Export Ban
Rice Export Ban Agrowon
ॲग्रोमनी

Rice Export Ban: भारत तांदूळ निर्यातीवर बंदी घालणार ?

Team Agrowon

भारत तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) घालणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाढत्या महागाईला (Inflation) तोंड देण्यासाठी सरकार गहू निर्यातबंदीनंतर (Wheat Export Ban) आता तांदळाच्या मागे लागण्याची शक्यता आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा भाताच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्यातबंदी किंवा निर्यातीवर बंधने घालण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.

भारताची गणना जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या देशांमध्ये केली जाते. दीडशेहून अधिक देशांना भारत तांदूळ निर्यात करतो. भारताने २०२१ मध्ये तांदूळ निर्यातीचा विक्रम केला. २०२१ मध्ये भारताने २१.५ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. जगातील सर्वात मोठे धान्य निर्यातदार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकत्रित निर्यातीपेक्षाही ती जास्त होती.

यंदाही भारतीय तांदळाला निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. भारत तांदूळ निर्यातीवर बंदी घालेल, या भीतीने बांगलादेशने यंदा तांदूळ आयातीची घाई केली आहे. बांगलादेशने तांदळावरील आयातशुल्क ६२.५ टक्क्यांवरुन २५ टक्क्यांपर्यंत खाली आणले. त्यामुळे तांदळाचे दर सध्या वाढले आहेत.

दुसऱ्या बाजुला देशाच्या अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची चिंता सतावू लागली आहे. यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा सहा दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला. परंतु देशात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस हा सरासरीपेक्षा पाच टक्के कमी आहे. त्यामुळे देशात भाताची लागवड गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्के घटली आहे. पावसाची स्थिती सुधारली नाही तर तांदूळ निर्यातीवर बंधनं यायची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा लवकर भारतात दाखल झाला. मॉन्सून २९ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला. परंतु नंतर मात्र त्याचा पुढचा प्रवास थंडावला. त्यामुळे जुनमध्ये सरासरीच्या आठ टक्के कमी पाऊस झाला.

पावसाने ओढ दिल्यामुळे भाताची लागवड रखडली. एक जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात ४३ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत भात लागवड २७ टक्के घटली आहे.

जुलैमध्ये दीर्घकालिन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. भात आणि सोयाबीन, कापूस, मका, ऊस यासारख्या प्रमुख खरीप पिकांचे भवितव्य जुलैमधील पावसावर अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT