Silk Farming Success Story : लातूर तालुक्यातील शिराळा ते गाधवड या रस्त्यावर आकाश जाधव यांच्या कुटुंबाची तीन एकर शेती आहे. त्यांनी मेकॅनिकल शाखेतून पदविका घेतली असून, पुण्यातील खासगी कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केली. मात्र कोरानानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव गावी आले.त्या आधी त्यांचे वडील अरुणराव हे विहिरीच्या पाण्यावर ऊस पीक घेत. मात्र आकाश यांनी निपाणी (ता. कळंब) येथील काही शेतकरी रेशीम शेतीतून उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळवत असल्याचे टीव्हीवर पाहिले. तेथे प्रत्यक्ष जाऊन रेशीम शेतीची माहिती घेतली. धाडस करत २०१६ मध्ये तुती लागवड केली. २५ बाय ५० फूट आकाराचे शेड उभारत त्याच वर्षी पहिली बॅच घेतली. दीडशे अंडीपुंजांचे संगोपन केले. .पहिल्याच बॅचमधून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याने हुरूप वाढला. वडिलांसोबत काम करताना पुण्यापेक्षा गावातच महिन्याला चांगले उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे लक्षात आले. मग आई-वडिलांशी चर्चा करून रेशीम शेतीच करण्याचा निर्धार केल्याचे आकाश सांगतात.कोरोनानंतर कंपनीतून कधी येताय? म्हणून फोन येऊ लागले. तेव्हाच २०२१ मध्ये तत्कालीन जिल्हा रेशीम विकास अधिकारी नरसिंग बावगे यांनी चॉकी सेंटरचा मार्ग दाखवला. हिंदूपूर येथील आंध्र प्रदेशच्या सरकारच्या केंद्रामध्ये तीन महिने प्रशिक्षण घेतले. जून २०२१ मध्ये चॉकीची पहिली दीड हजार अंड्यांची बॅच घेतली. .Reshim Sheti: गुणवत्तापूर्ण चॉकी निर्मितीसाठी निर्जंतुकीकरणावर भर.घरीच १५ फूट बाय १८ फूट हॉलमध्ये रॅकची उभारणी केली. पुढे मागणी वाढल्यानंतर शेतात बांधकाम केले. रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना अंडीपुंज खरेदीपासून प्रत्यक्ष रेशीम कोषाचे उत्पादन घेईपर्यंत ४५ दिवस लागतात. यातील दहा दिवसांचा कालावधी चॉकी सेंटरमुळे कमी होतो. पूर्वी पिवळे (गावरान) कोष मिळत असत, आता हायब्रीड (संकरित) कोष मिळतात. या संकरित कोषापासून अधिक उत्पादन मिळत असल्याने मागणी वाढली. पर्यायाने त्यांच्या चॉकी सेंटरच्या व्यवसायाला उभारी मिळाल्याचे आकाश सांगतात..Reshim Sheti : ऐन चंणचणीच्या काळात रेशीमशेतीचा हातभार.लातूर डीसीसी देशातील पहिली बँकलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. रेशीम शेतीसाठी दोन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिले जात होते. आकाश यांच्या व्यवसायाला बँकेचे मार्गदर्शक, अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर आकाश यांनी अधिक कर्जाची गरज त्यांना पटवून दिली.त्यानंतर बँकेने अंदाजपत्रक घेऊन पंधरा दिवसांत कर्जाची फेररचना केली, त्यामुळे रेशीम शेतीसाठी सव्वातीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू लागले. या धोरणाचा पहिला लाभ आकाश यांना झाला. त्यानंतर चॉकी सेंटरसाठीही बँकेने पहिल्यांदा धोरण निश्चित करून बारा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले. अशा प्रकारे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणारी देशातील एकमेव लातूर जिल्हा बँक असावी. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची कमतरता भासली नाही. तसेच बॅंकेने त्यांना रोल मॉडेल म्हणून ओळख निर्माण करून दिल्याचे आकाश सांगतात..व्यवसायासाठी वाहनांची खरेदीपरिसरातील शेतकऱ्यांसाठीही चॉकी सेंटर महत्त्वाचे ठरते. त्यांना कमी वेळेत गुणवत्तेच्या व खात्रीशीर रेशीम अळ्या देता येतात. त्यामुळे आकाश यांच्या व्यवसायाची भरभराट सुरू झाली. जसजसा व्यवसाय वाढत गेला तशी सामानांसाठी व फिरतीसाठी वाहनाची गरज भासू लागली. त्यामुळे दहा लाख रुपये खर्चून पिकअप वाहन घेतले. स्वतःसाठी एक साडेतीन लाखांची बुलेट घेतली. एक एकर जमीनही खरेदी केली. चॉकी सेंटरसाठी इमारतीचे बांधकामही केले. निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर अधिक होत असल्याने रॅक निर्मिती करताना लोखंडाऐवजी पीव्हीसी पाइप व लहान नळ्या वापरल्या आहेत. २२ फूट बाय ४० फुटांमध्ये अळ्यांचे संगोपन केले जाते. सेंटरमध्ये २६ ते २८ अंश सेल्सिअसम तापमान व आर्द्रता हे हीटर व ह्युमिडीफायरद्वारे नियंत्रित करतात. या व्यवसायातून बारा जणांना नियमित रोजगार मिळाला आहे. चार वर्षांत केवळ चॉकी सेंटरच्या व्यवसायातून ही प्रगती साधली. चॉकी सेंटरमधून वर्षाला सुमारे बारा लाख रुपये उत्पन्न मिळते. याशिवाय पूर्वीच्या रेशीम कोष निर्मितीचे उत्पन्न वेगळे असून, ते आमच्यासाठी बोनस असल्याचेही आकाश सांगतात.येत्या काळात रेशीम शेतीतील पुढचा टप्पा म्हणून मांजरा कृषी विज्ञान केंद्र यांच्या साह्याने रेशीम कोष खरेदी करून धागा निर्मिती केंद्र सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांच्या धडपडीला माजी आमदार धीरज देशमुख यांचे मार्गदर्शन मिळत आहे. व्यवसायात वडील अरुण, आई आशा, भाऊ सागर व पत्नी पल्लवी यांची मदत मिळत असल्याचे आकाश यांनी सांगितले..चॉकी निर्मितीअंड्यांचा रंग ग्रे असतो. दोन दिवसांत निळा (पिनहेड स्टेज) होतो. त्यानंतर अंड्यांचे फ्रेममध्ये ब्लॅक बॉक्सिंगमध्ये करतो. दोन दिवस ब्लॅक बॉक्सिंगनंतर अंड्यातून अळी बाहेर (हॅचिंग डेट) येते. फ्रेम उघडून त्यावरील पेपर काढला जातो. त्यावर एक बाय एक फुटाची जाळी टाकली जाते. त्यावर शेंड्याची तीन, चार पाने बारीक कापून टाकतात. याला ब्रशिंग म्हणतात. पेपरवर व जाळीवरच्या अळ्या काढून एकत्र केल्यानंतर तुती पाल्याचा बेड केला जातो. त्यानंतर दोन वेळा पाला खाऊ घातला जातो. तीन दिवस प्रक्रिया सुरू राहते. सहा फीडिंग (पाला खाऊ घालणे) झाल्यानंतर अळी तोंड वर करून सुप्तावस्थेत जाते. याला पहिला मोल्ट म्हणतात. चार फीडिंग झाल्यानंतर बेड वाढवावा लागतो. चोवीस तासांच्या मोल्टनंतर त्यावर चुना मारला जातो. अंगावरच्या कातीन निघून त्यातून अळी बाहेर येते. तिला खाण्यासाठी उत्तेजित करणाऱ्या पावडरचा वापर केला जातो. पुन्हा मोठी दोन बाय तीन फुटांची जाळी टाकली जाते. पहिल्या बेडवरून दुसऱ्या बेडवर जाळी टाकून फीडिंग सुरू केली जाते. तीन दिवस सहा ते सात फीडिंग केल्या जातात. दोन फीडिंग झाल्यानंतर बेड वाढवावा लागतो. चारपासून आठ बेड तयार होतात. पुन्हा अळ्या ३६ तासांच्या मोल्टवर जातात. शेवटच्या कालावधीत मोल्टमध्ये असतानाच अळ्यांवर चुना मारायचा व त्यांची विक्री करायची. नऊ ते दहा दिवसांत दोन अवस्थेतील अळ्या म्हणजे चॉकी विक्रीसाठी तयार होत असल्याचे आकाश सांगतात. अशा प्रकारे दहा दिवसांत सहा हजार चॉकीचे उत्पादन घेतले जाते. लातूर व धाराशिवसोबतच अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री करतो..तुतीची जोपासनाअंडी व अळ्यांची हातावरील फोडाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. अळ्यांना सुरुवातीला शेंड्याचा कोवळा पाला लागतो. त्यानंतर थोडा जून पाला चालतो. अळ्यांच्या वाढीनुसार लहान बाळाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. दर्जेदार पालाच या व्यवसायातील महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी दरवर्षी केवळ शेणखतावर दोन एकरांमध्ये तुतीचे उत्पादन घेतात..व्यवसायातील अर्थकारणचॉकी सेंटर ःउत्पादन खर्च बाबी१) अंडीपुंज खरेदी - शंभर अंडीपुंज - १३०० रुपये२) पेपररोल व साहित्य - ४०० रुपये३) दहा दिवस संगोपन - ७०० रुपये४) विक्री - ३५०० रुपये५) निव्वळ उत्पन्न - ११०० रुपयेरेशीम शेती व्यवसायशंभर ते दीडशे अंडीपुंजवेचणी, वाहतूक, पेपररोल व साहित्य - ८००० रुपयेवेचणी - ३००० रुपयेऔषध व पेपररोल साहित्य - १५०० रुपयेमजूर - २००० रुपयेवाहतूक - १५०० रुपयेविक्री - ८६,२५० रुपये, ५७५ रुपये किलो रु. दीड क्विंटलउत्पन्न - ८०,००० रुपये (एका सरकारी बॅचला.)वर्षातून अशा चार ते पाच बॅच घेतात.आकाश जाधव, ८००७४९३६६० .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.