Cotton Rate
Cotton Rate Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate : कापसाच्या दरात सुधारणा का झाली?

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसावरील दबाव आज काहीसा दूर झाल्याचं दिसलं. आज आयसीईवर कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्के वाढ झाली होती. कापसाने मागील महिनाभरातील उच्चांकी टप्पा गाठला. याचा देशातील बाजारावर काय परिणाम झाला? देशात कापसाला काय दर (Cotton Rate) मिळाला? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी. 

1. सोयाबीन दरात सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. तर सोयातेलाचे दर आज जवळपास सव्वा टक्क्याने वाढले. सोयापेंडही जवळपास एक टक्क्याने सुधारली. याचा परिणाम देशातील बाजारावरही होत आहे. आज सोयाबीनच्या बाजारात पुन्हा क्विंटलमागे १०० रुपयाने वाढ झाली. आज देशात सोयाबीनला ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये सरासरी दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि सोयापेंडचे दर सुधारल्यास देशातील सोयाबीनलाही आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

2. उडदाचे दर तेजीतच

देशातील बाजारात सध्या उडदाला चांगला दर मिळतोय. उडदाची टंचाई जाणवत असल्याने दरात सुधारणा झाली. त्यामळे सरकार आयात उडदाची खरेदी करणार आहे. त्यासाठी सरकारनं किमान आधारभूत दरही जाहीर केला. मात्र मुख्य उडीद पुरवठादार म्यानमारमध्येही उडदाचा साठा कमी आहे. त्यामुळे उपलब्धता वाढली नाही. सध्या देशात उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उडदाचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

3. गाजराचे दर वाढले

गाजराला सध्या चांगला दर मिळतोय. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे गाजराच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे सध्या बाजारातील गाजराची आवक कमी झालेली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजार समित्या वगळता गाजराची आवक सरासरी २० क्विंटलपेक्षा कमीच होतेय. त्यामुळे गाजराच्या दराने सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांचा टप्पा गाठलाय. गाजराचे दर पुढली काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

4. डाळिंबाच्या भावात नरमाई

राज्यातील बाजारपेठांमध्ये डाळिंबाचे दर दबावात आहेत. त्यातही सध्या डाळिंबाची आवक काहीशी कमी दिसते. यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळे अशा डाळिंबाला मिळणारा दरही नरमला. सध्या राज्यात डाळिंबाची सरासरी ५ हजार ते ८ हजार रुपयाने विक्री होत आहे. दर्जेदार डाळिंबाला चांगला दर मिळतोय. मात्र अशा डाळिंबाचं प्रमाण कमी आहे. डाळिंबाचे दर पुढील काही दिवस असेच राहू शकतात, असं डाळिंब बाजारातील जाणकारांनी सांगितलं. 

5. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात होते. त्यासोबतच देशातील बाजारातही कापसाला कमी उठाव होता. पण आज आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारात कापसाचे दर सुधारले. इंटरकाॅंटीनेन्टल एक्सचेंजवर अर्थात आयसीईवर कापसाच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा पाहायला मिळाली. आयसीईवर ऑगस्ट महिन्यापासून कापसाच्या दरात सतत घट दिसून येत होती. कापसाने सर्वांत कमी ७२ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा ३१ ऑक्टोबर रोजी गाठला होता. त्यानंतर मात्र कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होत गेली. आज कापसाने १२ ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक ८७.३० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला. आज कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्क्यांनी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्याने देशातील बाजारालाही आधार मिळाला. आज देशातील कापूस दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी सुधारले. देशपातळीवर कापसाला आज सरासरी ७ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर राज्यातील सरासरी दर ७ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये क्विंटल राहिला. कापसाचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्यास देशातही कापसाचे दर सुधारतील. फेब्रुवारीपर्यंत कापूस सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असा जाणकारांचा सल्ला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT