Soybean Market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : देशातील सोयाबीन बाजार दबावात का आला?

यंदा अर्जेंटीनातील उत्पादनात मोठी घट झाली. मात्र ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले. त्यामुळं दरात जास्त तेजी आली नव्हती.

Anil Jadhao 

Soybean Market Update : देशातील बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन दर (Soybean Rate) दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या दरात (Soymeal Rate) मोठी घट झाली.

त्याचाही दबाव देशातील सोयाबीन बाजारावर (Soybean Market) जाणवत आहे. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे.

देशातील बाजारात सध्या सोयाबीनच्या दरावर दबाव आहे. यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढली. त्यामुळं प्रक्रिया प्लांट्सकडून सोयाबीनला मागणी होती. पण दीड महिन्यापासून बाजारातील सोयाबीन आवक जास्त होत आहे.

उद्योगांना माल सहजपणे आणि कमी दारत उपलब्ध होत असल्यानं उद्योगांनी दर वाढवले नाहीत. मार्च महिन्यातील आवकेचा विचार करता सोयाबीन आवक जवळपास दुप्पट असल्याचे व्यापारी सांगतात.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात सोयाबीनची दैनंदीन आवक सरासरी ८० हजार ते ९० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. पण सध्या जवळपास २ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे.

आवकेच्या दबावामुळं दर कमी झाले. देशातील अनेक बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. ही दरपातळी मागील दीड महिन्यापासून कायम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं शेतीमाल बाजारात मोठी नरमाई आली. सोयाबीन वायद्यांमध्ये प्रतिबुशेल्स एक डाॅलरची नरमाई आली. तर सोयापेंडचे भाव ५० डाॅलरने कमी झाले.

शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १४.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ४४५ डाॅलरपर्यंत कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील या स्थितीचाही देशातील सोयाबीन बाजारावर परिणाम झाला.

दर सुधारतील का?

यंदा अर्जेंटीनातील उत्पादनात मोठी घट झाली. मात्र ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले. त्यामुळं दरात जास्त तेजी आली नव्हती. तर आता बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळेही दरात नरमाई आली. पण ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारती. देशातही सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT