Chana Market News Updates Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market: हरभऱ्याच्या दरात चढ उतार का सुरु झाले?

Anil Jadhao 

हरभऱ्याला सणांमुळे चांगला उठाव आहे. पण दरात चढ उतारही दिसत आहेत. देशातील बाजारात हरभरा भाव मागील तीन दिवसांपासून काहीसे नरमले आहेत. वाढलेल्या भावात सुरु झालेली नफावसुली, कमी झालेला उठाव आणि नाफेडच्या विक्रीचा हरभरा भावावर दाबाव दिसतो. मग सध्या हरभरा बाजारात काय स्थिती आहे? मागणी असतानाही हरभऱ्याच्या भावात चढ उतार का दिसत आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

मागील तीन दिवसांपासून हरभरा दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची नरमाई दिसून आली. दिल्लीमध्ये जी २० परिषद सुरु असल्याने मालवाहू ट्रक्सना प्रवेश नाही. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. तसेच हरभरा दरात वाढ झाल्यानंतर वाढलेल्या दरात हरभऱ्याला काहीशी मागणी कमी झाली. तसेच नाफेडची विक्रीही सुरु झाली. परिणामी हरभरा भावावर काहीसा दबाव आला आहे. हरभऱ्याचे भाव सध्या ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मागील काही दिवसांपासून भावपातळी या दरावर आहे. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये दरातील ही नरमाई दिसून आली.

सरकारने चालू हंगामातील देशातील हरभरा उत्पादन विक्रमी १३६ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज जाहीर केला होता. तसेच मागील हंगामातील २० ते २५ लाख टनांचा शिल्लक स्टाॅक होता. म्हणजेच देशात हरभऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात राहीला. तसेच यंदाच्या हंगामात नाफेडकडे मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३८ लाख टनांच्या जवळपास स्टाॅक होता.  नाफेडने चालू हंगामात २३ लाख ५० हजार टनांची खरेदी केली होती. तर मागील हंगामातील १४ लाख टनांचा स्टाॅक नाफेडकडे होता.

हरभरा स्टाॅक जास्त असल्याने सहाजिकच बाजारावर मोठा दबाव होता. जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना आपला हरभरा हमीभावापेक्षा कमी भावात विकावा लागला होता. सरकारने हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला होता. मात्र बाजारात शेतकऱ्यांना ५ हजांच्या पुढे भाव मिळाला नाही. बहुतांशी शेतकऱ्यांना आपला हरभरा ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकावा लागला होता. अनेक शेतकऱ्यांनी ऐन आवकेच्या हंगामात माल न विकता दरवाढीची वाट पाहिली. पण बाजारात पुरवठा अधिक असल्याने भाव दबावात राहीले.

हरभरा भावात तेजी आली ते ऑगस्टपासून. जुलैपासून सणांसाठी हरभऱ्याला मागणी वाढू लागते. ऑगस्ट महिन्यातही मागणी चांगली राहिली. पण ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यातच नाही तर देशात मोठी दडी मारली. १२२ वर्षातील कमी पाऊस यंदाच्या ऑगस्टमध्ये पडला. तसेच सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच यंदा रब्बीसाठी पिकांना पाण्याची मोठी टंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा दराला मोठा आधार मिळाला.

देशातील अनेक बाजारांमध्ये हरभरा भाव ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांवर पोचले होते. पण मागील काही दिवसांपासून या वाढलेल्या भावात हरभऱ्याला उठाव कमी झाला. तसेच या भावात काहीशी नफावसुलीही सुरु झाली होती. परिणामी हरभऱ्याचे भाव क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी नरमले होते. त्यातच नाफेडनेही स्टाॅकमधील हरभरा विकण्यास सुरुवात केली. यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. यापुढील काळात हरभऱ्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT