Tur Market: बाजारात तुरीचे दर टिकून; दरात काहीसे चढ उतारही सुरु

Tur Bajarbhav : सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी मिलर्सना तुरीची विक्री करणार आहे. पण यामुळेही तुरीच्या दरातील तेजी कमी होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांनी सांगितले.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Tur Market Rate : देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण तुरीचा भाव आजही ९ हजार ते १० हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी मिलर्सना तुरीची विक्री करणार आहे. पण यामुळेही तुरीच्या दरातील तेजी कमी होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांनी सांगितले.

Tur
Tur Rate Today: ४ एप्रिल रोजी राज्यातील तूर बाजार दरात कुठे झाली वाढ? आवक घटली का वाढली?

देशात यंदा तुरीच्या उत्पादनता मोठी घट झाली. त्यातच आयातीवर मर्यादा असल्याने देशांतर्गत बाजारात मोठी वाढ झाली. तुरीच्या भावात झालेली वाढ मात्र सरकारची डोकेदुखी ठरली. निवडणुका काही महिन्यांवर आल्यानंतर सरकार वाढलेले भाव कमी करण्यासाठी अॅक्शन मोडवर आले. सरकारने टप्प्याटप्प्याने निर्णय घेत भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. स्टाॅक लिमिटही लावले. आता स्टाॅकमधील तूर विक्रीचा निर्णय सरकारने घेतला.

Tur
Kharif Season : खरिपात तूर, मुग, सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण कमी

सरकार तुरीच्या बाजारावर दबाव वाढवत आहे. सरकारने तूर आयात वाढीसाठी प्रयत्न केले. स्टाॅकमधील तूरही विक्री करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तूर दरवाढीला काहीसा ब्रेक बसला. मागील महिनाभरात तुरीचे भाव स्थिर होते. तुरीचा कमाल भाव १० हजार ५०० रुपये होता. दरात वाढ होत नसल्याने आणि सरकारचा बाजारावरील दबाव वाढत असल्याने स्टाॅकिस्ट नफावसुली करत आहेत. यामुळे तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत.

तुरीच्या दरात मागील तीन आठवड्यांपासून २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत चढ उतार सुरु आहेत. बाजारभाव एका पातळीपेक्षा जास्त वाढत नसल्याने अनेक स्टाॅकिस्ट माल बाहेर काढत आहेत. यामुळे दरही स्थिर आहेत. सध्या बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. तर डाळीचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये १३० ते १४० रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत.

देशात लगेच तुरीचा पुरवठा वाढण्याची कमीच आहे. देशातील नवी तूर नोव्हेंबरपासून बाजारात येईल. तर आफ्रिकेतील तूर ऑगस्टपासून बाजारात येईल. पण देशात आयात होईपर्यंत सप्टेंबर उजाडू शकतो. आफ्रिकेत ६ लाख टनांच्या आसपास तूर उपलब्ध होऊ शकते, असे आयातदारांनी सांगितले. पण यंदा तुरीचा पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीचे भाव देशाचा हंगाम सुरु होईपर्यंत कायम राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com