soybeans
soybeans Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : देशात सोयाबीनला काय दर मिळतोय?

Team Agrowon

Soybean Rate Update : सोयाबीन बाजार मागील तीन दिवसांपासून स्थिरावला आहे. सोयाबीन दरात सुधारणा झाल्यानंतर बाजारातील आवकही वाढली. दरवाढीचे वाट पाहणारे पण जास्त दिवस थांबू शकत नाहीत, असे शेतकरी सोयाबीन विकत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात अर्जेंटीनाचा माल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरमाई दिसत आहे. मग अर्जेंटीनात उत्पादन घटल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात का येईल? सध्या सोयाबीन बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती या लेखातून पाहू.

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) यंदा मोठी घट झाली. भीषण दुष्काळामुळे उत्पादन निम्म्यावर आलं. अर्जेंटीनाचे सोयाबीन उत्पादन यंदा २५० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात अर्जेंटीनात ४२० लाख टन उत्पादन झाले होते.

म्हणजेच उत्पादनातील घटीमुळे अर्जेंटीनात सोयाबीनचा तुटवडा जाणवणर. यामुळे अर्जेंटीनातील शेतकरी सोयाबीन विकताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेने सोयाबीन मागं ठेवलं.

त्यामुळं उद्योगांना पुरेशा प्रमाणात सोयाबीन मिळत नाही. अर्जेंटीनात मागील काही वर्षांपासून सोयाबीन गाळप उद्योगाचा मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळं सरकारचीही चिंता वाढली.

यंदा उत्पादन घटल्याने अर्जेंटीनाची सोयाबीन आयात वाढणार आहे. पण चांगला भाव मिळाल्याशिवाय देशातील सोयाबीन बाहेर येणार नाही, हे माहीत असल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी सोयाडाॅलर योजना आणली.

यामुळं अर्जेंटीनातील सोयाबीन आता आंतरराष्ट्रीय बाजारात येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवरही मागील तीन दिवसांपासून सोयाबीन आणि सोयापेंड दरात नरमाई दिसून आली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १४.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४५४ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील सोयाबीन दर मात्र मागील आवड्यात काहीसे वाढल्यानंतर स्थिरावले. दुसरीकडे दरात काहीशी सुधारणा झाल्यानंतर अनेक शेतकरी सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये सोयाबीन आवक वाढली.

तर प्रक्रिया प्लांट्सच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे भाव सध्या ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील दर ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

देशातून यंदा सोयापेंड निर्यात वाढली. आत्तापर्यंत जवळपास दुप्पट निर्यात भारतातून झाली. एप्रिल महिन्यातही निर्यात चांगली होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीनला मागणी राहील.

उद्योगांना सोयापेंडचे सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीनची खरेदी करावी लागेल. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते.

सध्याच्या पातळीवरून दरात काहीसे चढ उतार दिसले तरी दर कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पुढील काळात सुधारणा होण्यास पोषक स्थिती आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT