Turmeric Market
Turmeric Market Agrowon
ॲग्रोमनी

Turmeric Market : देशातील हळदीचे दर स्थिरावले: गेल्यावर्षीच्या तुलनेत मात्र कमीच

Anil Jadhao 

Turmeric Rate : देशात हळदीला उठाव कमी आहे. त्यामुळे हळदीचे दरात मोठी नरमाई आली होती. पण देशातून हळद निर्यात (Turmeric Export) १० टक्क्यांनी वाढली आहे.

निर्यात वाढल्याने दरातील नरमाई काहीशी थांबली. मात्र हळदीचे अद्यापही गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलमागं एक हजार रुपयांनी कमीच आहेत.

देशात २०२०-२१ मधील उत्पादन ११ लाख २३ हजार टनांवर हळद उत्पादन स्थिरावले होते. तर २०२१-२२ मध्ये देशात १३ लाख ३० हजार टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.

यंदा मात्र उत्पादनात घट काहीशी घट होऊन १३ लाख १४ हजार टन उत्पादन स्थिरावेल, असा अंदाज काही संस्था व्यक्त करत आहेत. मागील काही वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भात हळदीची लागवड वाढली. त्यामुळं या भागातील उत्पादनाचा बाजारावर परिणाम होत असतो.

महाराष्ट्रातील हळद उत्पादक काही भागांमध्ये पावसाचा हळद पिकाला फटका बसला. इरर राज्यांमध्येही काही प्रमाणात हळद पिकाला फटका बसला. हळद बाजारातील व्यापारी आणि प्रक्रियादारांच्या मते, हळद उत्पादनात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची घट झाली.

तसचं तमिळनाडू आणि कर्नाटकात प्रक्रियेसाठी मागणी वाढली. या राज्यांमध्ये जवळपास अडीच लाख टन हळद प्रक्रिया उद्योगांकडे गेली. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला.

देशात मागील हंगामातील शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात होता. तसेच यंदाचं उत्पादनही ठिकठाक राहण्याचा अंदाज होता. त्यामुळं बाजारावर दबाव होता. त्यातच देशात मागील काही महिन्यांपासून हळदीला कमी उठाव होता. त्यामुळे हळदीच्या नरमाई दिसून आली.

पण मध्यल्या काळात हळदी निर्यात वाढल्याने दराही काहीशी सुधारणा झाली. पण अद्यापही हळदीचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. इरोड बाजारात हळदीला सध्या सरासरी ६ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.

मागीलवर्षी याच बाजारातील सरासरी भाव ७ हजार ८०० रुपये होता. महाराष्ट्रातील बाजारांमध्ये सध्या हळदीला सरासरी ६ हजार रुपये भाव आहे. मागील हंगामातील हाच भाव ७ हजार ३०० रुपये होता.

निर्यात १० टक्क्यांनी वाढली

मसाले बोर्डाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या कालात देशातून होणारी निर्यात १० टक्क्यांनी वाढून १ लाख १२ हजार टनांवर पोचली. मागील हंगामात याच काळात एक लाख टनांची निर्यात झाली होती.

देशात हळदीला मागणी कमी असून निर्यातीने आधार दिल्याने दर टिकून आहेत. देशात मागील दोन महिन्यांपासून हळद दरातील नरमाई थांबल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील मालाचा दबाव येईल

महाराष्ट्रातील हळद बाजारात आल्यानंतर काही काळ दर दबावात राहू शकतात, असं व्यापारी सांगत आहेत. महाराष्ट्रातील हळदीची आवक जून महिन्यापर्यंत जास्त राहू शकते.

निर्यातीला मागणी असल्याने दर टिकून राहू शकतात, असाही अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. माॅन्सून हंगामात पाऊस कसा राहतो? यावरही हळदीचे दर पुढील काळात अवलंबून असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT