Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Summer Weather Update : मालेगाव शहर व परिसरात दीड महिन्यापासून सूर्यदेव जणू आग ओकत आहे. असह्य उन्हाने नागरिक त्रस्त आहेत.
Heat Wave
Heat Waveagrowon

Nashik News : मालेगाव शहर व परिसरात दीड महिन्यापासून सूर्यदेव जणू आग ओकत आहे. असह्य उन्हाने नागरिक त्रस्त आहेत. सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा सुरू होतात, त्या रात्री उशिरापर्यंत कायम असतात. मेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (ता. १) पारा ४३ अंशांवर, तर गुरुवारी (ता. २) तापमान ४२.४ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी (ता. ३) पारा ४३.८ अंशांवर पोहोचला होता. शनिवारी (ता. ४) त्यात १ अंश सेल्सिअसने घसरण झाली होती.

Heat Wave
Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

बाजाराचा दिवस असल्याने व्यावसायिकांना कडक ऊन अंगावर झेलतच दुकाने लावावी लागली. येथे २९ एप्रिलला हंगामातील सर्वांत उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून तापमान वाढायला सुरुवात झाली. एप्रिल उजाडताच पारा ४२ अंशांच्या आसपास आहे. येथे १८ एप्रिलला ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते.

दोन दिवसांचा अपवाद वगळता महिन्यापासून पारा ४० ते ४४ अंशांदरम्यान राहिला.

वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होत आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ एकदमच कमी झाली आहे. कडक ऊन घाम फोडत असतानाच ऐन दुपारी वीजपुरवठा खंडित होण्याची परंपरा रोज येथे अनुभवास मिळत आहे. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नाही, असे नागरिक झाडांच्या सावलीचा सहारा घेत आहेत.

Heat Wave
Heat Update : विदर्भात यंदाचा एप्रिल महिना ठरला दहा वर्षांतील कमी उष्ण

महिनाभरापासून बाजारपेठांमध्ये दिवसभर तुरळक ग्राहक आढळत आहेत. अनेकजण खरेदीसाठी सायंकाळी उशिरा बाहेर पडतात. ऊन व उकाड्यामुळे रसवंतीगृहे, शीतपेये, कुल्फी, आईस्क्रीम, बर्फ गोळे, लिंबू सिकंजी, सब्जा शरबत आदींचा आधार नागरिक घेत आहेत. मालेगावच्या प्रसिद्ध मसाले ताकच्या दुकानांवर गर्दी होते.

आठवडे बाजारावर परिणाम

शुक्रवारी येथे आठवडे बाजार भरतो. बाजारात भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात लावली होती. व्यावसायिकांनी छत्री व प्लॅस्टिक कागदाची सावली केली होती. पारा ४३.८ अंशांपर्यंत गेल्याने सायंकाळी पाचपर्यंत बाजारात तुरळक ग्राहक होते. वाढत्या उन्हाचा आठवडे बाजारांवरही परिणाम होत आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी शेळ्या, मेंढ्या, बकरी, कोंबडी यासह जनावरांचा बाजार भरतो. उन्हामुळे विक्रेते व ग्राहकांची संख्या मर्यादित होती.

गेल्या १० दिवसांतील तापमान स्थिती (अंश सेल्सिअस)

२४ एप्रिल ४२.०

२५ एप्रिल ४२.०

२७ एप्रिल ४२.०

२८ एप्रिल ४२.०

२९ एप्रिल ४४.०

३० एप्रिल ४३.२

१ मे ४३.०

२ मे ४२.४

३ मे ४३.८

४ मे ४२.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com