Team Agrowon
हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षात अनेक शेतकऱ्यांना हळदीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे.
यावर्षी सततच्या पावसामुळे तसेच हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे.
हळदीचे दरही घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. हळद हे हमखास उत्पादन देणारे पीक असले तरी हे पीक अतिशय खर्चिक आहे.
यावर्षी हळद काढणीचा खर्चही जास्त लागला. . हळदीचा दर पाच हजार ते साडेपाच हजाराच्या दरम्यान आहे.