Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : तुरीने गाठला १० हजारांचा टप्पा; कोणत्या मालाला मिळतोय हा भाव?

Tur Rate : चालू हंगामात तुरीचे भाव सुरुवातीपासूनच तेजीत राहीले. गेल्या हंगामात हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने यंदा मात्र उचल घेतली.

Anil Jadhao 

Tur Arrival Update : चालू हंगामात तुरीचे भाव सुरुवातीपासूनच तेजीत राहीले. गेल्या हंगामात हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने यंदा मात्र उचल घेतली. देशातील घटलेले उत्पादन, मर्यादीत आयात आणि चांगला उठाव यामुळे तुरीला चांगला भाव मिळत आहे. तुरीच्या दराने आता काही बाजारांमध्ये १० हजारांचा टप्पा गाठला.

चालू हंगामातील तूर बाजारात आली तेव्हा दर तेजीत होते. नवी तूर हाती येण्याच्या आधीच यंदा देशातील उत्पादन कमी असल्याचं स्पष्ट झालं होतं. गेल्या हंगामात तुरीला कमी भाव मिळाला होता.

हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने खरिपातील लागवड कमी झाल्यानंतर डोके वर काढले. नवा माल बाजारात येण्याच्या दोन महीने आधीच दारने हमीभावाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. तूर आवकेच्या काळातही भावात नरमाई दिसली नाही.

सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण सरकारला यश आले नाही. सरकारने व्यापाऱ्यांना आपल्याकडील स्टाॅकची माहीती देण्याचे आदेश दिले. तसेच मुक्त आयात धोरण लागू केले. बाजारात पुरवठा वाढविण्यासाठी सुरुवातीला आयात तूर खेरदी केली.

पण सरकारला १० हजार टनांचीही खेरदी करता आली नाही. आता सरकार देशातील आयातदार इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक करत असल्याचे सांगत आहे. तसेच या स्टाॅकीस्टनी तूर तातडीने बाजारात आणवी, अशा सूचनाही केल्या.

दुसरीकडे भारताची मागणी पाहून म्यानमारमधील निर्यातदारांनी तुरीचे भाव वाढवले. तसेच निर्यात मर्यादीत केली. आफ्रिकेतील तूर आणखी पाच महिन्यानंतर आयात होऊ शकते. आफ्रिकेत आता तूर नसल्यात जमा आहे.

फक्त म्यानमारमध्ये तूर उपलब्ध आहे. पण म्यानमारधील निर्यातदार आणखी भाव वाढण्याची वाट पाहत आहेत.

बाजारात तुरीचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक असल्याने देशातील अनेक बाजारांमध्ये तुहीने १० हजारांचा टप्पा गाठला. १० हजारांचा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ८ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

बाजारात पुढील चार ते पाच महीने तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT