Tur, Maize Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur, Maize Market : तूर, मक्याच्या बाजारभावात वाढ

Cotton, Moong Rate : या सप्ताहात कापूस व मूग यांच्या किमती घसरल्या. मुगाची आवक वाढत आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे.

डॉ. अरुण कुलकर्णी

Maize Market Rate Update : फ्यूचर्स किमती - सप्ताह- १७ ते २३ जून २०२३

या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे देशातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे. २३ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदा कापसाखालील क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्के घट झाली. अशीच घट सोयाबीन (३६ टक्के), तूर (६६ टक्के) व मका (२२ टक्के) या पिकांमध्येही दिसत आहे. मुगाचा पेरा मात्र ४१ टक्क्यांनी वाढला आहे.

या सप्ताहात कापूस व मूग यांच्या किमती घसरल्या. मुगाची आवक वाढत आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. मक्याचे भाव वाढत आहेत. ते जर हमीभावापेक्षा अधिक झाले तर हेजिंगचा विचार करावा.

२३ मे रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ५७,९२० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा २ टक्क्यांनी घसरून रु. ५६,७८० वर आले आहेत.

ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५७,०४० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५७,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.४ टक्का अधिक आहेत. कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवकही आता कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४४४ वर आले होते. या सप्ताहात ते १.८ टक्क्याने घसरून रु. १,४१८ आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४९० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे नवीन वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ३.४ टक्क्यांनी वाढून रु. १,८४० वर आल्या होत्या. त्या सप्ताहात त्या ७.३ टक्क्यांनी वाढून रु. १,९७५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमतीसुद्धा ७.२ टक्क्यांनी वाढून रु. १,९८६ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. २,०१० वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्याने अधिक आहेत. नवीन वर्षासाठी मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक वाढत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ७,७९६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ८,२५९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ५.५ टक्क्यांनी वाढून रु. ९,३१६ वर आल्या आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. ९,६९८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १७.४ टक्क्यांनी अधिक आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. १०,०८०) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अजून अनुकूल संधी आहे. आवक कमी होत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,८७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ४,९०० वर आल्या आहेत. चालू हंगामासाठी हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. या महिन्यातील हरभऱ्याचे भाव रु. ४,८०० ते रु. ५,००० दरम्यान आहेत. आवक कमी होत आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. ७,८५० वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने घसरून रु. ७,८०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या चार सप्ताहांत वाढू लागली आहे. गेल्या वर्षी ती जुलैमध्ये सर्वाधिक होती. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ जाहीर झाला आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती घसरत आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,२३९ वर आली होती. या सप्ताहात ती ०.२ टक्क्याने वाढून रु. ५,२५२ वर आली आहे. नवीन वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. ९,३९२ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने वाढून रु. ९,४५० वर आली आहे. तुरीचा नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो) कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

लेखक ई-मेल : arun.cqr@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT